क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण.
विशाल बांबोळे - कार्यकारी संपादक
रेगडी : दिनांक १५ नोव्हेंबर २०२३ रोज बुधवार ला दुपारी १.00 वा.भगवान बिरसा मुंडा चौक रेगडी येथे क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा युवा समिती रेगडीच्या,वतीने क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय श्री फक्री जी धानु नरोटे( गाव भूमिया रेगडी )तसेच प्रवीण जी मोहुर्ले सरपंच ग्रामपंचायत रेगडी तसेच माननीय सुरेश जी शहा जिल्हाध्यक्ष बंगाली आघाडी गडचिरोली यांच्या उपस्तितीत भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
अनावरांच्या कार्यक्रमानंतर विर बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकापर्यंत फेरी काढण्यात आली तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.