तक्षशिला बुद्ध विहार पेरमिली च्या वतीने संविधान दिन सन्मान रॅली.

तक्षशिला बुद्ध विहार पेरमिली च्या वतीने संविधान दिन सन्मान रॅली.


एस.के.24 तास


आल्लापल्ली : तक्षशिला बुद्ध विहार पेरमिली च्या वतीने संविधान दिनाचा कार्यक्रम शंकरजी कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.सर्वप्रथम भारतरत्न' संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन करण्यात आले. 

गावातून रॉली काढण्यात आली.तसेच संविधान दिनानिमित्त रात्रौ ९:०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आयु.शंकरजी कुंभारे पेरामिली हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून.


पत्रकार अशिफ खान पठाण,डॉ बिश्र्वाश,मेश्राम सर,बंडू दहागावकर,सुरेश कोंडागुर्ले,प्रफुल ढोंगे,सुरेखा दुर्गे,सुमन दहागावकर,लतिका दहागावकर,गिरजा दुर्गे,श्रीकांत दुर्गे आदी लाभले होते. पेरमिली व परिसरातील बौद्ध बांधव रॉलीत सहभागी होवून कार्यक्रमास बहुसंख्येनी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !