सावली त संविधान सन्मान रॅलीचे जंगी स्वागत.

सावली त संविधान सन्मान रॅलीचे जंगी स्वागत.


एस.के.24 तास


सावली : बल्लारपूर येथून निघालेली संविधान सन्मान रॅलीचे सावली येथें आगमन होतांच सावलीकर आयोजन समितीच्या वतीने व समता सैनिक दलाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. महात्मा फुलेच्या पुतळ्याना मालार्पण करून मानवंदना देत ही रॅली आंबेडकर स्मारक भवनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याना  वंदन करून ही रॅली  समता सैनिक दलाच्या पथसंचालनात कार्यक्रम स्थळी समाजमंदिरात पोहोचली.


यावेळी वेगळ्या विदर्भाचे प्रणेते आणि संसद पट्टू ऍड. वामनराव चटप  यांनी संविधानाचे जीवनात महत्त्व सांगत वेगळ्या विदर्भाची भूमिका विशद केली.यावेळी मंचावर उपस्थित आयोजन समितीचे प्रमुख अजय चव्हाण,प्रा.अरुण लाडे संविधान रॅलीचे उद्धाटक,प्रा. महेंद्र बेताल,ऍड.प्रियंका चव्हाण,अरुण पायघन,से.नी.मुख्याध्यापक मनोहर गेडाम,बसपा जिल्हा,अध्यक्ष मुकद्दर मेश्राम,जेष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गोपाल रायपुरे,उदय गडकरी,चंद्रकांत गेडाम, नगरसेवक,अंतबोध बोरकर,नगरसेवक प्रीतम गेडाम,कवडू गोंगले आदी कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते.


पुढे बोलताना अँड.चटप म्हणाले की संविधानात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी  जण हिताच्या दृष्टीने विचार करून राज्यघटना लिहिली आहे.ओबीसी  समाजालाही महत्वाचे स्थान दिले आहे.मात्र काही समाज विघातक लोकांनी बदनाम करण्याचे षडयंत्र राखून राज्यघटनेत बदल करण्याचा घाट करीत आहेत.त्यामुळे आपण वेळीच सतर्क झालो पाहिजे.राज्यघटनेत वेगळ्या विदर्भाची तरतूद केली आहे. वेगळा विदर्भ झाल्यास बेरोजगारी,शेतकऱ्यांचे प्रश्न,विद्दुत आदी प्रश्न सुटतील अशी भूमिका कार्यक्रम मंचावरून मांडली. यासाठी विदर्भ निर्माण जनजागरण यात्रेच्या रॅलीत सहभागी होण्याचे  आवाहन  त्यांनी केले आहे.


या कार्यक्रमाचे प्रास्तावित गोपाल रायपुरे, सूत्रसंचालन प्रा.अरुण लाडे,व आभार राहुल उंदिरवाडे समता सैनिक दलाचे प्रमुख यानी मानले.तसेच कार्यक्रमाचे यशस्वीते करिता आशिष गेडाम समता सैनिक दलाचे प्रमुख(मेजर), गिरजाशंकर दुधे सैनिक, आदींनी मेहनत घेतली.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !