वेटलिफ्टींग स्पर्धेत गौरी बोरकुटे ची निवड.

वेटलिफ्टींग स्पर्धेत गौरी बोरकुटे ची निवड.


प्रवीण झोडे - सावली


सावली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धा निवड चाचणी 2023 - 24 दिनांक 26 नोव्हेंबर 2023 ला गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली येथे घेण्यात आली.


यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली ची खेळाडू 49 किलो वजन गटात बाबत गौरी बोरकुटे बीएससी फायनल हिने प्रथम स्थान प्राप्त करून अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये तिची निवड झाली आणि तिला गोंडवाना विद्यापीठ कलर होल्डर च्या मान मिळाला. 


त्याबद्दल शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.भास्कर सुकारे महाविद्यालयाचे सन्माननीय कार्यकारी प्राचार्य,डॉ.खोब्रागडे मंडळाचे अध्यक्ष आदरणीय संदीप भाऊ गड्डमवार साहेब उपाध्यक्ष सन्माननीय अनिलजी भाऊ स्वामी मंडळाचे सचिव सन्माननीय राजा पाटील संगीडवार साहेब आणि महाविद्यालयीन समस्त कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !