सावली स्वच्छता कामगार याना ब्लॅंकेट व भेट वस्तू वाटप.
◆ सावली तालुका वाम परिवार व आर्य वैश्य महिला महासभा यांचा स्तुत्य उपक्रम.
प्रवीण झोडे - सावली
सावली : आर्य वैश्य महिला महासभा व सावली तालुका वाम परिवार च्या वतीने आज सावली नगरंचायतीच्या 40 सफाई कर्मचारी यांना थंडी पासून ऊब मिळावी या हेतूने स्वच्छता कामगार याना ब्लॅंकेट व दीपावली चा फराळ नगरपंचायत येथे भेट वस्तूच्या स्वरूपात देण्यात आला. अशा प्रकारें आर्य वैश्य महिला महासभा सावली व वाम परीवार सावली तालुका है दोन्ही संघ परिवार मदती करीता पुढें सरसावली आहे. असे विवीध उपक्रम या आर्य वैश्य व वाम परिवार तर्फे आयोजित केले जातात. या स्तुत्य उपक्रम ची सावली नगरात चर्चा होताना दिसत आहे.
यावेळी स्वच्छता कामगार याना भेट वस्तू देत असताना सावली नगरपंचायत चे नगराध्यक्ष लताताई लाकडे तसेच आर्य वैश्य महिला महासभेचे अध्यक्ष पल्लवी ताटकोंडावार आणि सावली तालुका वाम परिवार चे अध्यक्ष रूचिता ताटकोंडावार, उपाध्यक्ष प्रज्ञाताई चिंतलवार, सचिव पल्लवी दंडमवार, आर्य वैश्य महासभा व वाम परिवारातील सदस्य गण वृषाली बेजगमवार, सपना वीरमलवार, आरती वीरमलवार, रिया बेजगमवार, किरण बंडावार, शैला चीमड्यालवार, सरिता यासलवार, ममता ताटकोंडावार, आरती ताटकोंडावार , श्वेता बेजगमवार, वंदना चिंतलवार, साक्षी वल्यालवार, वनिता बेजगंमवार, श्रुती आईंचवार, प्राची चीमड्यालवार आर्य वैश्य महिला महासभा व सावली तालुका वाम परिवारातील पदाधिकारी सफाई कर्मचारी वर्ग उपस्थितीत होतें.