महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,नागपूर जिल्हा तर्फे संविधान रॅली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,नागपूर जिल्हा तर्फे  संविधान रॅली.


एस.के.24 तास


नागपूर : संविधान दिनानिमित्त  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,नागपूर जिल्हा तर्फे संविधान चौक ते जुने मॉरीस कॉलेज टी.पॉईंट पर्यंत दिनांक २६ नोव्हेंबर २३ रोजी दुपारी ४ वाजता भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले होते.  ह्या रॅली चे उदघाटन  डॉ.सतीश नगराळे यांनी केले . तर प्रमुख उपस्थिती रामभाऊ डोंगरे राज्य कार्यकारिणी सदस्य,विजयाताई श्रीखंडे राज्य विभागीय सदस्य,चित्तरंजन चौरे जिल्हा कार्याध्यक्ष,देवानंद बडगे शाखा कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांची  संविधान पर समयोचित भाषणे झालीत. 

देवानंद बडगे,अजय रहाटे,पिल्लेवान ताई यांनी संविधान पर गीते  सादर केलित रॅली च्या अगोदर संविधान दीना वर आधारित  जागृती संविधानकी हे पथनाट्य व ज्योतिबा चा संघर्ष हे बहारदार नाट्ये  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,नागपूर च्या चमूंनी सादर केली व त्यानंतर विविध वेशभूषेतील महिला कार्यकर्त्यांनी डोक्यावर संविधान घेऊन  मार्गक्रमण केले.


 डॉ.सुनील भगत,प्रधान सचिव,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,नागपूर यांनी संविधान ची उपयोगिता,कर्तव्य,अधिकार ह्यावर प्रकाश टाकला व आभार प्रदर्शन केले.प्रा.पुष्पा घोडके यांनी संचालन केले.


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे सदस्य सविता मेंढे,देवयानी भगत,सुषमा शेवाळे,मंगला गाणार, इंदुताई उमरे,चंदा मोटघरे,अजय राहाटे,रॉकी घुटके,वर्षा सहारे,राजकुमार पटले,प्रा.माणिक लोणारे, आशुतोष टेंभुर्ने, विभूतीचंद्र गजभिये शाखा अध्यक्ष,अलका लाडे,प्रज्ञा डोंगरे,अरुण भगत,डॉ. विकास होले,विजय पारधी,शशिकांत बनकर, विजयकांत पानबुडे,अशोक राऊत,पिल्लेवान, सोमकुंवर ताई,मंडपे ताई, दिवे ताई,अरविंद तायडे व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,नागपूर सर्व सदस्यांनी कार्यक्रमात हिरीरीने भाग घेतला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !