डॉ.बाबासाहेब आंबेडकर " समाज रत्न " पुरस्काराने प्रभाकर सोनडवले सन्मानित.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर " समाज रत्न " पुरस्काराने प्रभाकर सोनडवले सन्मानित.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,११/११/२३ वनविभागात कार्यरत असल्यामुळे मुक्या पशु- पक्षी हिंस्त्र प्राण्यांची भाषा समजून घेऊन रानात फिरत असतांना सतर्क होणारे,संकट काळात सापडलेल्या प्राण्यांची प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतः प्रसंगी डॉक्टर च्या मदतीने उपचार करून त्यांना मोकळे रान मिळवून देऊन स्वच्छंदपणे फिरायला सोडणारे,तहानलेल्या मुक्या प्राण्यांना घनदाट अरण्यात पाण्याची व्यवस्था करून त्यांची तहान भागविणारेआणि वनराईने नटलेल्या भूमीचे रक्षण करणारे

श्री,प्रभाकरजी सोनडवले यांचा नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.शैक्षणिक काळापासून त्यांना समाजसेवा करण्याची खूप आवड आणि तळमळ. वनविभागात वृक्ष,पशु - पक्षांची.


वनविभागाततील कार्यरत कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कास्ट्राईब संघटने द्वारा आवाज उठवून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची सेवा करता करता त्यांनी सामाजिक सेवेकडे आपली असलेली ओढ निरंतर चालू ठेवली आणि त्यामुळेच त्यांनी केलेल्या आणि करीत असलेल्या समाजसेवेचे कार्य लक्षात घेऊन नागपूर येथील मदत या सामाजिक संस्थेने त्यांची दखल घेतली.


 आमदार नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात मदत संस्थेचे सचिव दिनेश बाबू वाघमारे, आमदार गिरीश पांडव यांच्या शुभ हस्ते अनिल नगराळे,ईश्वर मेश्राम अॅड.अशोक यावले ,संजय कडोळे , युवराज चौधरी ,परमानंद सरदार ,अशोक गवळी सुदाम खरे, सुरेखा दिनेश वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान चिन्ह ,प्रशस्तीपत्र आणि हर घर संविधान पुस्तकाचे पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. 


त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्या मित्रांनी, नातेवाईकांनी, समाजातील बंधू भगिनींनी , आप्तेष्टांनी भरभरून अभिनंदनाचा वर्षाव केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !