शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढऊन द्यावी. - सभापती राकेश रत्नावार

शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढऊन द्यावी. -               सभापती राकेश रत्नावार      


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : एकतर शासनाने मुल येथे देण्यात येणारे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरवातीला नवरगाव येथे देण्यात आले होते.त्यामुळे मुल तालुक्यातील शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली. यासाठी सी.डी सी.सी.बँकेचे अध्यक्ष यांनी  शेवटी राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचेकडून मुल येथे आधारभूत खरेदी केंद्र उशिरा मंजूर केले. त्यामुळे उशिरा सुरू झालेली नोंदणी उद्या दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी संपत असल्याने आजच्या स्थितीत हजारो शेतकरी नोंदणी करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.                                          

एकीकडे आकस्मिक अवकाळी पाऊस आल्याने मुल तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांचे धान कापून असल्याने पाण्यामुळे भिजून खराब झाले आहे. करीता ओले झालेल्या धानाला अतिशय कमी भाव मिळेल किंवा व्यापारी ते धान खरेदी करणार नाही. त्यामुळे शेकऱ्यावर संकट कोसळले आहे.


आकस्मिक पाऊसामुळे ओले धानाचे पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन नोंदणी करण्यासाठी वेळ नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था मुल तालुक्यातील शेतकरी बांधवांची झाली आहे. एकतर उशिरा नोंदणी सुरू केल्यामुळे मुदतीच्या आत तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची नोंदणी होऊ शकली नाही. 


अजूनही असंख्य शेतकरी वंचित आहेत. करीता  दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सलग एक महिना मुदत वाढ त्वरित देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांनी चंद्रपूर जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !