डॉ.अशोक जिवतोडे यांना राष्ट्रसंत साहित्य विशेषांक भेट.
★ राष्ट्रसंताचे समग्र साहित्य ग्रामपरिवर्तनाच्या कार्यास अधिक गतीमान करणारे - डॉ.जिवतोडे
एस.के.24 तास
चंद्रपूर : मानवतेचे महान पुजारी थोर तत्वज्ञ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५५ वी पुण्यतिथी तथा सर्व संत स्मृती मानवता दिनाचा कार्यक्रम देशविदेशातील श्रीगुरुदेव सेवकांच्या उपस्थितीत गुरूकुंज आश्रम येथे नुकताच संपन्न झाला. गुरूकुंज आश्रम येथील श्री गुरुदेव प्रकाशन विभागाच्या वतीने या निमित्ताने साहित्य विशेषांक प्रकाशित करण्यात आला.हा साहित्य विशेषांक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी शिक्षणमहर्षी डॉ. अशोक जिवतोडे यांना सस्नेह भेट दिला.
सदर विशेषांक राष्ट्रसंताच्या समग्र साहित्यावर आधारित असून येथील विचारधन ग्राम परिवर्तनाच्या कार्यास अधिक गतीमान करणारे असल्याचे मत डॉ. जिवतोडे यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी याप्रसंगी श्री गुरुदेव मासिक विभागाच्या कार्यास धन्यवाद दिले.
या विशेषांकाच्या निर्मितीसाठी श्री गुरुदेव वाड्.मय विभागाचे समिती प्रमुख भानुदास कराळे, विभाग प्रमुख गोपाल कडू, संपादक डॉ. दीपक पुनसे, सदस्य प्रभाकर गायकवाड, मनोहर रेचे, डॉ. संजय जेवढे, प्रा. रुपलाल कावळे, सौ. पौर्णिमाताई सवाई, सचिव प्रल्हाद गिरी , लेख संपादन सहकार्य बंडोपंत बोढेकर आदींनी या करिता विशेष परिश्रम घेतले.