सिंदेवाही तहसील कार्यालयात सर्व पक्षीय बैठक आयोजित ; नवीन मतदार नोंदणीसाठी झाली चर्चा.
अमोल निनावे - ता.प्र.सिंदेवाही
सिंदेवाही : शासनाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार दरवर्षी प्रमाणे नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू झाला असून त्या अनुषंगाने तहसील कार्यालयात नुकतीच तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी यांची बैठक आयोजित करून नवीन मतदार नोंदणी बाबत नागरिकांना जागृत करण्यासाठी चर्चा करण्यात आली.
मुख्य निवडणूक अधिकारी यांचे आदेशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष सक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू झाला असून सदर कार्यक्रमा नुसार दिनांक २७ ऑक्टोबर ते ९ डिसेबर या कालावधी मध्ये दावे हरकती स्विकारण्यात येणार आहेत.त्यामध्ये नविन मतदार नोंदणी ,मय्यत मतदारांची वगळणी किंवा स्थलांतरी,आक्षेपित मतदारांची वगळणी,तसेच मतदार यादीतील तपशिल दुरुस्ती बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे दिनांक ४ आणि ५ नोव्हेबर तसेच २५ नोव्हेबर व २६ नोव्हेबर या चार दिवशी विशेष मोहिमे अंतर्गत मतदार नोदी शिबीर सिंदेवाही तालुक्यात मतदान केंद्रावर आयोजीत करण्यात आलेले आहे.
तरी सर्व पात्र मतदारांना सदर कालावधी मध्ये नविन मतदार नोंदणी, दुरुस्ती किंवा आक्षेपित नोंद विहीत नमुना नंबर ६,७,८, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे कडे जमा करावे किंवा ऑनलॉईन व्होटर हेल्पलाईन ॲप व्दारे नोंदणी करण्यात यावी. तसेच गावागावांतील प्रत्येक नागरिकांना नवीन मतदार नोंदनी करण्यासाठी सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी पुरस्कृत करावे अशी चर्चा करण्यात आली. यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी,तथा तहसीलदार संदीप पानमंद,नायब तहसीलदार तुमराम,तसेच तालुक्यातील सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.