सिंदेवाही माकडा ची शिकार करताना डीपी वर चढलेल्या बिबट्याचा जिवंत वीज प्रवाहाचा स्पर्श झाल्याने मृत्यू.

सिंदेवाही  माकडा ची शिकार करताना डीपी वर चढलेल्या बिबट्याचा जिवंत वीज प्रवाहाचा स्पर्श झाल्याने मृत्यू.


एस.के.24 तास


सिंदेवाही : सिंदेवाही वन परिक्षेत्रात येणाऱ्या खातगाव भेंडारा येथे माकडाची शिकार करताना डीपीवर चढलेल्या बिबट्याचा जिवंत वीज प्रवाहाचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली.


वन परिक्षेत्र अधिकारी व वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सिंदेवाही पशुधन विकास अधिकारी डॉ. विनोद सुरपाम, डॉ. शालिनी लोंढे यांच्या उपस्थितीत मृत बिबट्याची पाहणी करण्यात आली. वनविभागाने पंचनामा केला. मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, सिंदेवाही तहसीलचे वन परिक्षेत्र अधिकारी विशाल साळकर,क्षेत्र सहाय्यक दीपक हटवार, वन कर्मचारी,विद्युत विभागाचे कर्मचारी,पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


आठ दिवसांपूर्वी विजेच्या डीपीवर माकडाचा मृत्यू झाल्याचे गावातील लोकांचे म्हणणे आहे. याची माहिती वीज विभागाला फोन वरून देण्यात आली.विद्युत विभागाने रिमोटने लाईन बंद केली. मात्र माकडाला तिथेच राहू दिले,असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.वनविभागाकडून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !