पोटेगाव इलाका व भीम ज्योती बहुउद्देशीय संस्था च्या वतीने संविधान दिन साजरा.

पोटेगाव इलाका व भीम ज्योती बहुउद्देशीय संस्था च्या वतीने संविधान दिन साजरा.


एस.के.24 तास


गडचिरोली : पोटेगाव परिसरातील ग्रामसभा व  भीम ज्योती बहुउद्देशीय संस्था च्या वतीने पोटेगाव येथील गोटुल समितीमध्ये सविधान दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

सुरुवातीला पोटेगावांमध्ये संविधानावर आधारित घोषवाक्य देऊन प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर संविधानाचे वाचन शिवा नरोटे यांनी करून संविधान दिन साजरा करण्यात आला. 


या कार्यक्रमाचे रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष, मुनेश्वर बोरकर होते.प्रमुख मार्गदर्शक,भोजराज कान्हेकर जिल्हाध्यक्ष बामसेफ होते.गोपालजी रायपुरे रिपाई चंद्रपूर,बामसेफ सचिव,प्रमोद राऊत,एस.के.24 चे मुख्य संपादक,सुरेश कन्नमवार होते.

रिपाई जिल्हाध्यक्ष मुनेश्वर बोरकर म्हणाले की, संविधानाने आम्हाला स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्याय दिला.त्यामुळे सर्व जाती-जमातीचे लोक एकत्र राहत आहोत.बामसेफ जिल्हाध्यक्ष, भोजराज कानेकर म्हणाले की,या देशात संविधान आहे म्हणुन आपण स्वाभिमानाने जगत आहोत.जर संविधान संपले तर बहुजन समाज स्वाभिमान शून्य होईल.गोपाल रायपुरे म्हणाले की,आज संविधान धोक्यात आलेले आहे. प्रस्थापित सरकार संविधान संपविण्याच्या षडयंत्रात आहे.त्यामुळे त्याला धडा शिकविणे आपले काम आहे.प्रमोद राऊत जिल्हा सचिव यांनी संविधानातील विविध कलमांचे सविस्तर स्पष्टीकरण करून दाखवले.

       


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मालता मडावी,पं.स. सदस्य,कांताताई हलामी,वामन बांबोळे,मनोहर पोटावी,केशव कडयामी,शिवा गावडे,सविता पोटावी,कालिदास हिचामी,अभिमन्यू सुरपाम, स्वीटी गेडाम,महादेव पदा,लक्ष्मण सोनुले,रामेश्वर सोनुले,सयाजी वाडगुरे,राजू पेरगुरुवार,एकनाथ मडावी,दिवाकर फुलझेले,सिद्धार्थ गोवर्धन,लोमेश खुकडकर,पंकज रामटेके,आदित्य रंगारी,नितीन पदा,अर्चना सुरपाम,संदीप पाटील,विलास गोवर्धन,सिताराम तुलावी,संगीता मुंजमकर,शीला रामटेके यांनी सहकार्य केले.

      

या कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वर मुंजमकार प्रास्ताविक किशोर मुनरतीवार आभार विजय रामटेके यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !