शालेय विभागीय टेनिक्वाईट क्रिडा स्पर्धेत संत शिवराम महाराज विद्यालयाने बाजी मारली.

शालेय विभागीय टेनिक्वाईट क्रिडा स्पर्धेत संत शिवराम महाराज विद्यालयाने बाजी मारली.


नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी,भंडारा


भंडारा : येथील विदर्भ हाउसिंग बोर्ड कॉलोनी तकीया वॉर्ड भंडारा स्थित संत शिवराम महाराज विद्यालयाच्या मुलांच्या आणि मुलींच्या ही चंमुने  दिनांक    4 व 5 नोव्हेंबर 2023 शनिवार, व रविवार ला  झालेल्या शालेय विभागीय टेनीक्वाईट क्रीडा स्पर्धेत 14 वर्षा खालील व 19 वर्षा खालील मुलांच्या गटात संत शिवराम महाराज माध्यमिक विद्यालय भंडारा येथील मुलांच्या संघाने संघाने अंतिम  फेरीत सामन्यात नागपूर (मनपा) व नागपूर (ग्रामीण)  संघाचा दारुण पराभव करुन विभागीय स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले. 


तर 19वर्षाखालील मुलींच्या गटात पुन्हा संत शिवराम महाराज विद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करून अंतीम सामन्यात चंद्रपूर संघाचा पराभव केला आहे त्यामूळे या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. व या संघांचे सांगली येथे होणा-या शालेय राज्य स्तरीय स्पर्धे करिता निवड करण्यात आली आहे.

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परीषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयं   भंडारा यांच्या संयुक्तं विद्यमाने विभागीय शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धा भंडारा येथील रुख्मिणी नगर हनुमान मंदीर जवळ असलेल्या पटांगणात घेण्यात आले . यावेळी भंडारा जिल्हा टेनिक्विट असोसिएशन जिल्हा अध्यक्ष ॲड. मधुकांत बांडेबुचे, सचिव ऍड मृणाल बांडेबुचे, क्रीडा मार्गदर्शक अरूण बांडेबुचे,संजय पडोळे  यावेळी पंच म्हणून मोहन वाघमारे, रेणुका व्यावहारे, नंदिनी फेंडर, सुरज दुधकवर, अश्विनी बोदेले, अजय चेटुले, जितेश हलमारे, अमोल बांडेबुचे तसेच   जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे मार्ग मंगेश गुडधे याचे मार्गदर्शन लाभले.


यशस्वी विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका  अर्चना भोयर,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक देवचंद चौधरी,शारिरीक शिक्षक संजय पडोळे,शेखर बोरकर,धीरज बांते, अल्का हटवार,सुरज गोंदोळे,दारासिंग चौव्हाण,राधीका बांते,रजणी सेलोकर,पार्वती बिसने,रंजना भिवगडे,माया वैद्य,ज्योती रामटेके, वर्षा साखरे,बिरे,चाचेरकर, मेहर, सैनपाल वासनिक,गंगाधर भदाडे, राजू निंबार्ते,जागेश बांते, यांना देत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !