अमरदीप लोखंडे, सहसंपादक.
ब्रह्मपुरी : दिनांक,२०/११/२३ ब्रम्हपूरी येथे आयोजित राजीव गांधी सभागृहात अखिल भारतीय बुरुड समाज गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण व मार्गदर्शन तथा ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभाचे आयोजन ब्रम्हपुरी स्थानिक बुरुड समाज आयोजन समिती तसेच अखिल भारतीय बुरुड समाज कोअर कमिटीच्या वतीने घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.नानाजी गराडे हे होते.प्रा.प्रदिप हिरापूरे यांनी बुरुड समाजाची आजची दशा आणि दिशा यावर आपल्या प्रास्ताविक भाषणात प्रकाश टाकला.तसेच बुरुड समाजातील अज्ञानता, अंधश्रद्धा, समाजातील विवाहित तरुण तरुणींचे आत्महत्येचे कारण व यावरील उपाय या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व्हावे या तळमळीने प्रमुख वक्ते म्हणून मान. प्रा.डॉ.विनायकजी तुमराम (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विचारवंत तथा महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी पुरस्कारांनी सम्मानित आदिवासींचे नेते,नागपूर) यांनी आजचे शिक्षण व नवी पिढी: वास्तव आणि वाटचाल या विषयावर विद्यार्यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील जीवनाचे मार्गक्रमण राजकीय स्थितीला धरून कशा प्रकारे करावे या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच भारतीय संविधानाची इत्तंभूत माहिती विद्यार्थ्यांना तसेच सामान्य जनतेला कशा प्रकारे महत्त्वाची ठरते यावर बुरुड समाजातील तरुणांची कानउघाडणी करून मोलाचे मार्गदर्शन केले.
मान.प्रा.डॉ.युवराज मेश्राम ने.हि.महाविद्यालय, ब्रम्हपुरी यांनी विद्यार्थ्यांना,वर्तमान विद्यार्थी : महापुरुषांचे आत्मचरित्र आणि मानवी मूल्य संस्कार* या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. प्रा. युवराज मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना लहानपणापासून ते संसार थाटे पर्यंतच्या जीवनात गुरुजन तसेच महापुरुषांच्या चारित्र्याचा योगदानाबरोबर आईचे महत्त्व कशाप्रकारे आहे यावर मोलाचे मार्गदर्शन केले व मानवी मूल्यांवर प्रकाश टाकला. तसेच कार्यक्रमाप्रसंगी सुनील कुंभरे, अनिकेत गराडे, स्वप्नील हांडे, ललित बोरकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमामध्ये शेखर नागापूरे, मंडळ अधिकारी आरमोरी,डॉ.सुरेश गराडे गोंदिया, श्रीहरीजी नागपुरे नागपूर,कल्पणाताई बोरकर ब्रम्हपुरी,अजयजी बोरकर नागपूर, नरेशजी नागपुरे गडचिरोली,शैलेंद्रजी बोरकर नागपूर, पुंडलिकजी गराडे आरमोरी,आनंदरावजी मुंडे ब्रम्हपुरी,महेशजी बोरकर नागपूर,डॉ.कैलाशजी कलारे इलाहाबाद,राजेशजी गराडे भुबनेश्वर, महेश कलारे चाचेर,प्रमोद नागपुरे नागपूर, प्रकशजी नागपुरे नागपूर आदींनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ब्रम्हपुरी बुरुड आयोजन समितीतील पदाधिकारी श्री.भैरव गराडे,चंदुजी गराडे,प्रमोदजी बोरकर, समीर गराडे, फकीर गराडे,शेखर बोरकर,सोमेश्वर बोरकर, हर्षल मुंडे, अनीलजी गराडे,घनश्याम नागपुरे,प्रल्हाद गराडे,सोहम गराडे,चेतन मुंडे, मोहन नागापूरे,महेश नागापूरे,पंकज नागपुरे, सचिन नागपुरे,बबन गराडे ललिता गराडे, सपना गराडे,अँड.श्रुती बोरकर तसेच ब्रम्हपुरीतील समस्त बुरुड बांधव आणि भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.