सेवा सहकारी सोसायटी,अ-हेर नवरगाव येथे आनंदाचा शिधा मोठ्या उत्साहात वाटप.

सेवा सहकारी सोसायटी,अ-हेर नवरगाव येथे आनंदाचा शिधा मोठ्या उत्साहात वाटप.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,१०/११/२३ महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब जनतेची दिवाळी आनंदात ,सुख - समृद्धीत गेली पाहिजे, त्यांच्या मुखात काहीतरी गोड पदार्थ गेला पाहिजे या उदात्त हेतूने दिवाळीच्या सणानिमित्याने सरकारी स्वस्त धान्य दुकानातून रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने अ-हेनवरगाव येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानातून भालेश्वर व 

अ-हेरनवरगाव येथील कार्डधारकांना सोसायटीचे अध्यक्ष श्री.विनोद वामनराव कावळे,सचिव श्री,ए.आर.उरकुडे सेल्समन दिनेश चंद्र ठेंगरे,सतीश ढोंगे,बालचंद्र ठेंगरे,सदस्य वामनराव मिसार,लक्ष्मण नंदनवार व इतर पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आला.आनंदाचा शिधा घेत असतांना कार्डधारकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते जणू काही दिवाळीची फुलझडी त्यांच्या चेहऱ्यावरच उजळली होती.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !