महायुतीचा मविआ वर दणदणीत विजय.
★ राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या निकालाची जणू नांदीच. - प्रा.अतुलभाऊ देशकर माजी आमदार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,०७/११/२३ महाराष्ट्र राज्यात एकूण 2257 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून त्यांचे निकाल देखील जाहीर झालेले आहेत. या निवडणुकांचे परिणाम अपेक्षित आणि सकारात्मक असेच आहेत. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात कार्यरत असलेले महायुती सरकार
जनतेसाठी,समाजातील सर्वच घटकांसाठी सूक्ष्म नियोजन करून विकास कार्य करीत असलेल्याचा हा सकारात्मक परिणाम असून आगामी काळात होऊ घातलेल्या प्रत्येकच निवडणुकांसाठी महायुतीला जनतेचा पाठिंबा असल्याचा कौल जनतेनी या निवडणुकीच्या माध्यमातून केला तसेच हे येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या निकालांची नांदी असल्याचे गौरवोद्गार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय तथा सर्वाभिमुख नेतृत्व माजी आमदार आदरणीय प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी केले आहे.
देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वात दोन्ही सरकार जनतेच्या हिताची, जनतेच्या काळजाला स्पर्श करणारी कार्य करीत असल्यामुळे जनता जनार्दन प्रभावीत झालेली असून जनतेचा कौल भाजपा तथा मित्र पक्षांकडे आहे. भविष्यात देखील जनतेने भाजपा आणि मित्र पक्षांना असाच कौल देऊन देश उभारणी आणि देशसेवेच्या कार्यात अमूल्य योगदान प्रदान करावे असे आवाहन देखील प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी केले आहे.