विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी दिला सोनापूर येथील कॅन्सरग्रस्त महिलेस आधार.
एस.के.24 तास
सावली : दिनांक,१७ नोव्हेंबर २०२३ विरोधी पक्षनेते,माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.श्री. विजयभाऊ वडे्ट्टीवार यांच्यातर्फे मौजा.सोनापूर येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण मायाबाई लालाजी भुरसे वय ३७ वर्ष यांना सोनापूर ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.डोमाजी शेंडे व उपाध्यक्ष मा.देवराव पाटील भांडेकर यांच्या करवी आर्थिक मदत देण्यात आली.
सौ.मायाबाई लालाजी भूरसे ह्या घरातील कर्तृत्वान स्त्री असून पती लालाजी भुरसे यांच्या सोबत संसाराचा गाढा चालवीत आहेत, मागील काही दिवसापासून आजारी असल्यामुळे उपचार घेत होत्या.उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे स्पष्ट केले,घरातील आर्थिक स्थिती बिकट असल्याने पुढील उपचारासाठी आर्थिक मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळाली.त्यांनी तात्काळ राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांना संपर्क करून सौ.मायाबाई लालाजी भूरसे यांना आर्थिक मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना अध्यक्ष ग्राम कांग्रेस कमेटी सोनापुर मा.डोमाजी शेंडे,मा.देवराव पाटील भांडेकर उपाध्यक्ष ग्राम कांग्रेस कमेटी,युवा कार्यकर्ता मा.अविनाश भुरसे,मा.नंदकिशोर बांबोळे, माजी उपसरपंच ग्रा.प.सोनापूर मा.पांडुरंग बांबोळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्रीधर सोनुले,मा.दिनकर वाघाडे उपाध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी तसेच गाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मा.कवेश्वर भांडेकर,मा.पंकज रनदिवे,मा.मनोज कोसरे,मा.विलास भोयर,मा.एकनाथ भूरसे,मा.डोपाजी वाघाडे तसेच आदी कार्यकर्ते उपस्थित होते.