जिल्हाधिकारी,संजय मिना यांना निवेदन देताना,विशाल बांबोळे,निर्देशक,रंजन सरकार,आशिष राऊत,जितेंद्र दुधे,अंजिरा कुकटकर उपस्थित होते. |
राज्यातील आय.सी.टी.योजनेत सेवा दिलेल्या संगणक निर्देशकांना पूर्ववत मानधनावर सामावून घेण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन.
विशाल बांबोळे - कार्यकारी संपादक
गडचिरोली : राज्यातील केंद्र पुरस्कृत आय.सी.टी.योजने अंतर्गत माध्यमिक शाळेतील मुला-मुलींना संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी 8 हजार शाळेतील अद्यावत संगणक लॅबची उभारणी करण्यात आली होती.तसे संगणक लॅब चालवणे व विद्यार्थ्यांना संगणक साक्षर बनवण्यासाठी तीन टप्प्यात 8000 संगणक शिक्षकांच्या नेमणूका पाच वर्षासाठी करण्यात आलेल्या होत्या आता करार संपलेला आहे.
सध्या स्थिती संगणक नादुरुस्त व धुळक्यात पडले आहेत परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तसेच पाच वर्षे सेवा दिलेले संगणक शिक्षक संगणक निर्देशक बेरोजगार झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.तसेच राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळणे बंद झाले आहे.संगणक निर्देशकांच्या बाबतीत इतर बऱ्याच राज्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन सेवेत सामावून घेतलेले आहेत.परिणामी राज्य शासनाचे सदर योजनेवर केलेले गुंतवणुक वाया जात आहे.
या संदर्भात दि 01/11/2023 ला संगणक आयसीटी शिक्षक संघ त्यांच्या वतीने राज्यातील ict योजनेत सेवा दिलेल्या संगणक निर्देशकांना पूर्ववत मानधनावर सामावून घ्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे माननीय संजय मीना जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष,विशाल बांबोळे,व इतर आय.सि.टी.निर्देशक,रंजन सरकार,आशिष राऊत,जितेंद्र दुधे आणि अंजिरा कुकटकर उपस्थित होते.