बापुराव वैद्य यांच्या संस्कृती या लेखसंग्रहाचे प्रकाशन संपन्न.संस्कृती लेखसंग्रह म्हणजे बापुराव वैद्य यांच्या ज्ञानात्मक जाणिवांचे जागरण. - बंडोपंत बोढेकर

बापुराव वैद्य यांच्या संस्कृती या लेखसंग्रहाचे प्रकाशन संपन्न.

संस्कृती लेखसंग्रह म्हणजे बापुराव वैद्य यांच्या ज्ञानात्मक जाणिवांचे जागरण. - बंडोपंत बोढेकर 

एस.के.24 तास


बल्लारपूर : बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड मधून सेवा निवृत्त झालेले बापुराव वैद्य यांच्या  संस्कृती या लेखसंग्रहाचे प्रकाशन संत तुकाराम महाराज सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक बंडोपंत बोढेकर,राष्ट्रीय  नाइटिंगेल पुरस्कार प्राप्त  पुष्पाताई पोडे, म.रा.ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या एड.शैलाताई वांढरे,माजी सैनिक मनोज ठेंगणे आदींच्या उपस्थितीत संपन्न झाले. अध्यक्षस्थानी संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग जरिले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेंद्र खाडे यांनी केले.जीवनातील अनुभवांचे प्रकटीकरण भावना, विचार आणि कल्पनांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती करीत असतो.


ती त्यांची अभिव्यक्ती असते. ज्येष्ठ लेखक बापुरावजी वैद्य यांचा ' संस्कृती ' लेखसंग्रह म्हणजे त्यांच्या ज्ञानात्मक जाणिवांचे जागरण असल्याचे ते म्हणाले. या पध्दतीने मंडळाच्या ज्येष्ठ नागरिकांनी आपले स्वानुभव शब्द बध्द करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
नगर धनोजे कुणबी समाज द्वारा संचालित श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ बल्लारपूर बामणी च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि  ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .


या प्रसंगी डॉ.नितेश पावडे, मुख्याध्यापक संजय वाग्दरकर,गजाननराव घुगुल, किसनराव पोडे,पुरूषोत्तम पोटे,एम.यु.बोंडे, विनायक साळवे,कमलताई वडस्कर,मनोहर माडेकर यांची उपस्थिती होती. अतुल बांदूरकर, केशव थिपे,कुणाल कौरासे,सतीश घुगुल,प्रा.रवी साळवे,बालाजी भोंगळे,  विवेक खुटेमाटे,शंकर काळे,संजय उरकुडे,  तानाजी वैद्य, सौ. सोनाली काकडे,सौ.किरण बोबडे, प्रविण बरडे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नितीन वरारकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. वंदना पोटे यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !