आधुनिक भारताचा निर्मितीत श्रीमती इंदिराजी गांधी यांचे मोठे योगदान. - विजय मुत्यालवार,शहराध्यक्ष काँग्रेस सावली ★ काँग्रेस जनसंपर्क कार्यालय सावली येथे श्रीमती इंदिराजी गांधी यांची जयंती साजरी.

आधुनिक भारताचा निर्मितीत श्रीमती इंदिराजी गांधी यांचे मोठे योगदान. - विजय मुत्यालवार,शहराध्यक्ष काँग्रेस सावली


★ काँग्रेस जनसंपर्क कार्यालय सावली येथे श्रीमती इंदिराजी  गांधी यांची जयंती साजरी.


एस.के.24 तास


 सावली : दिनांक,१९ नोव्हें.२०२३ स्वतंत्र भारत देशाच्या पहिल्या कणखर आणी कार्यक्षम महिला पंतप्रधान,आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्वाचे योगदान असणाऱ्या,आयर्न लेडी स्व.श्रीमती इंदिरा गांधीजी यांच्या जयंती निमित्त अभिवादन पर कार्यक्रम मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार जनसंपर्क तथा तालुका काँग्रेस पक्ष कार्यालय सावली येथे पार पडला याप्रसंगी श्रीमती इंदिरा गांधी  यांच्या प्रतिमेला पुष्पहार व फुले अर्पित करून अभिवादन करण्यात आले.J

इंदिरा गांधींचा इतिहास कदाचित जगातील सर्वात लोकप्रिय भारतीय नेत्यांपैकी एक आहे. देशाच्या संस्थापकांपैकी एक,पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या असण्याव्यतिरिक्त त्या भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर, तिच्या मजबूत उपस्थितीमुळे भारताचे स्थान उदयोन्मुख जागतिक महासत्ता म्हणून विकसित करण्यात मदत झाली. त्यांचा कार्यकाळात इंदिराजींना अनेकांनी ‘द आयर्न लेडी ऑफ इंडिया’ म्हणून त्यांचे संबोधन केले आहे आज त्यांना सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे अभिवादन करण्यात आले.


यावेळी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मान.विजय मुत्यालवार,सावली शहर युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.अमर कोणपत्तीवार,जेष्ठ कार्यकर्ते मा.प्रशांतजी राईंचवार,माजी उपाध्यक्ष नं.प.सावली मा.भोगेश्वर मोहुर्ले,सावली शहर महिला अध्यक्षा सौ.भारती चौधरी,बांधकाम सभापती सौ.साधनाताई वाढई,नगरसेवक मा.सचिन सांगिडवार,सौ.कविता मुत्यालवार काँग्रेस जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम,मा.आशिष मुत्यालवार,मा.सुनील ढोले, यश गेडाम आदी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !