जि.प.सदस्या रचना गहाणे यांनी मानले शासनाचे आभार.

जि.प.सदस्या रचना गहाणे यांनी मानले शासनाचे आभार.


एस.के.24 तास


अर्जुनी मोर : गाव खेड्यात शासनाचे विविध उपक्रम राबविण्यात सदैव पुढाकार घेणा-या आशा स्वंयसेवीका व गटप्रवर्तिंकांच्या मानधनात शासनाने समाधानकारक वाढ केली.तसेच त्यांच्या ईतरही मागण्या मार्गी लावण्यात आल्याने आशा स्वंयसेविका व गट प्रवर्तकांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्या तथा भाजपा प्रदेश महिला मोर्चा च्या महामंत्री,रचनाताई गहाणे यांनी शासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहे.


महाराष्ट्रात ८० हजारापेक्षा जास्त आशा स्वंयसेविका व ३,६६४ गटप्रवर्तक कार्यरत आहेत. गावखेड्यात प्रत्येक घरापर्यंत पोहचुन शासनाचे विविध उपक्रम आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक राबवितात.कोरोणा काळात आपल्या जिवाची पर्वा न करता या स्वंयसेवकांनी अपार मेहनत घेवुन राष्ट्रीय कार्य पुर्ण केले.त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक यांचा ठिकठिकाणी सन्मान सुध्दा करण्यात आला. त्यांचे राष्ट्रीय कार्य आजही अविरतपणे सुरु आहेत.मात्र सर्वात सेवाभावी वृत्तीने काम करणा-या या स्वंयसेविकांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते.


मानधन वाढ व अन्य मागण्यांसाठी यांचे संघटनांनी अनेकदा आंदोलने केली होती.यावेळी 18 ऑक्टोबर पासुन जोरदार राज्यव्यापी आंदोलन करुन थेट मंत्रायलायाचे दार ठोठावण्यात आले.त्यामुळे राज्यातील ८० हजार आशा स्वंयसेविका यांचे मानधनात प्रत्येकी सात हजाराची वाढ करण्यात आली असुन आता त्यांना 15 हजार रुपये मासिक मानधन मिळणार आहे.तर राज्यातील ३६६४ गटप्रवर्तक यांना प्रत्येकी ६२०० रुपये वाढ करण्यात आली.


असल्याने त्यांना मासिक २६,१७५ रुपये मासीक मानधन मिळणार आहे.तर गटप्रवर्तकांना कंत्राटी दर्जा देण्याचे शासनाने मान्य केले असुन इतर मागण्यांचे संदर्भात विचार केला जाणार असल्याने तसेच या दोन्ही स्वंयसेविकांना दोन हजार रुपये भाऊबिज भेट म्हणुन दिवाळी पुर्वीच देण्यात येणार असल्याने आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक यांची दिवाळी गोड होणार असल्याने त्यांनी शासनाचे आभार मानले आहे.


आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक यांच्या आंदोलनाला यश येवुन मानधनात वाढ झाल्याने गोंदिया जिल्ह्यातील १,२०० आशा स्वंयसेविका व ७५ गटप्रवर्तक यांना लाभ होणार असल्याने जिल्हा परिषद सदस्या,रचनाताई गहाणे यांनी शासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !