श्री.गुरुदेव सेवा मंडळात रंगले झाडीबोली कवी संमेलन. ★ झाडी बोली कवीतेत अमिट गोडवा. - बंडोपंत बोढेकर

 


श्री.गुरुदेव सेवा मंडळात रंगले झाडीबोली कवी संमेलन.


★ झाडी बोली कवीतेत अमिट गोडवा. - बंडोपंत बोढेकर 


एस.के.24 तास


गडचिरोली : अ.भा.श्रीगुरूदेव सेवा मंडळ जिल्हा शाखा आणि झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोली जिल्हा शाखेच्या  संयुक्त विद्यमाने श्रीगुरूदेव प्राथमिक शाळा परिसरात झाडीबोली कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. 


 ह्या कवीसंमेलनाचे अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते.प्रमुख अतिथी म्हणून  झाडीबोली साहित्य मंडळाचे डाॕ.चंद्रकांत लेनगुरे, दलितमित्र नानाजी वाढई,नशाबंदी मंडळाचे   संदीप कटकुरवार आदींची  प्रमुख  उपस्थिती होती.


आजच्या कवी संमेलनात झाडीपट्टी वैभव ,लोकसंस्कृती, येथील लोकजीवनावर आपल्या बोलीतून कवींनी जो प्रकाश टाकला ते  प्रभावी  असल्याचे मत ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी मांडले. 


 या कवीसंमेलनात  बी.के. राजूभाई  यांनी आध्यात्मिक विषयावर आणि खेमदेव हस्ते  यांनी मायेनं केलन ही कविता तर  उपेंद्र रोहणकर (गडचिरोली)  यांनी जूनी गोस्ट ही झाडीकविता सादर केली.  ज्येष्ठ  कवी वसंत कुलसंगे यांनी धम्मशिल राजा रावण ही  कविता तर पुरूषोत्तम ठाकरे यांनी जनसेवक कविता सादर केली.डॉ. प्रवीण किलनाके यांच्या आई कवितेने तसेच मधुकर भोयर यांच्या पटवा अना हटवा या कवितेने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.


श्रीमती प्रतिक्षा कोडापे, किरण चौधरी, पुंडलीक काटकर,वर्षा राजगडे, आनंद बावणे आदींनी सामाजिक विषयांवर रचना सादर केल्यात. डाॕ.चंद्रकांत लेनगुरे यांनी ओबीसीचा प्रश्न तर सुनिल बावणे यांची गझल,वर्षा पडघम यांची दारूबंदी कविता तर मारोती आरेवार यांची लेका शिकाजो या झाडी कवितांस  श्रोत्यांनी चांगलीच दाद दिली. बंडोपंत बोढेकर यांच्या गाय या  प्रबोधनपर कवितेने संमेलनाचा समारोप झाला. कवी संमेलनाचे सुरेख सूत्रसंचालन मारोती आरेवार यांनी केले तर आभार विनायक साळवे यांनी केले.


 सहभागी कवी मंडळींना प्रमाणपत्र  देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.रजनी बोढेकर,पंकज भोगेवार आदींनी उत्तम सहकार्य केले

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !