टेकाडी येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न.

टेकाडी येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : दिनांक २८ नोव्हेंबर 2023 ला टेकाडी येथे माळी समाजाच्या वतीने सामाजिक क्रांती चे महामेरू व स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी चा कार्यक्रम माळी समाज भवन येथे साजरा करण्यात आला. 


या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री,चौधरी अध्यक्ष गुरूदेव सेवा मंडळ टेकाडी,प्रमुख मार्गदर्शक श्री,ईश्वर भाऊ लोनबले अध्यक्ष क्रांती ज्योत सेवा संघ, प्रमुख पाहुणे श्री,ओमदेव मोहुले तालुका अध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघ मुल,श्री दौलत जी शेंडे माजी सरपंच,रविंद्र चौधरी मंचावर उपस्थित होते. 


श्री.ईश्वर लोनबले यांनी आपल्या मार्गदर्शन करताना सांगितले की समाजाची  प्रगती ही युवकांच्या हाती असते,महापुरुषां च्या विचार आत्मसात करून घराघरात पुस्तक रूपी वाचनालयाचे मंदिरे स्थापन केले पाहिजे.आजच्या युवकांनी स्पर्धा परीक्षेकडे लक्ष केंद्रित करून ध्येय निश्चित करा,तरच समाज मोठा होईल. 

  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री,लक्ष्मण गुरनुले,    प्रास्ताविक श्री,ओमदेव मोहुले यांनी केले तर पाहुण्यांचे आभार श्री,स्वप्निल चौधरी यांनी मानले, सदर कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात समाज बांधवांची उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !