संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांची निवड. ■ मुल येथे पहिले महिला झाडीबोली साहित्य संमेलन ; मुल नगरीत ३ डिसेंबरला साहित्यिकांची मांदियाळी.

संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांची निवड.


■ मुल येथे पहिले  महिला झाडीबोली साहित्य संमेलन ; मुल नगरीत ३ डिसेंबरला साहित्यिकांची मांदियाळी.


एस.के.24 तास


मुल : नवसाहित्यिकांना प्रेरणा देत साहित्याची निर्मिती व्हावी म्हणून  झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर व  शाखा मूल यांच्या विद्यमाने ३ डिसेंबर२०२३ ला बालविकास प्राथमिक शाळा मूल येथे पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे . या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवयित्री सौ .शशिकलाताई  गावतुरे यांची निवड करण्यात आली आहे.  ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांची सावित्री ज्योतीची सावली , बालकाव्य कुंज व क्रांतीपर्व अशी ग्रंथसंपदा असून अनेक लेख व वैचारिक स्फुटलेखन प्रसिध्द आहेत. 


त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल २००६ ला भाग्यश्री महिला नागरी पतसंस्था यांचा पुरस्कार, २००८ ला अखिल भारतीय सदधर्मसेवा संघ अमरावतीचा मानवता पुरस्कार , २०१० ला आदिवासी विकास मंडळाचा समाजसेवा पुरस्कार , २०१८ ला नगर परिषद मूल तर्फे पुरस्कार , २०१९ ला योग समितीच्या वतीने सत्कार , २०१९ ला नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणेचा राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार , २०२० ला राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचा रा. ज. बोढेकर स्मृती साहित्य लेखन पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.


 साहित्य क्षेत्रातील करण्याबरोबरच सौ. गावतुरे यांचे सामाजिक कार्य मोठे आहे . २००२ पासून त्या बालसुसंस्कार केंद्र चालवतात . ग्रामगीतेच्या प्रचारासाठी श्री गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केले. १९९६ पासून निःशुल्क वाचनालय , योग प्राणायम वर्ग व शिबिरे चालवतात . शिक्षणाच्या प्रसारासाठी स्वतःचे घर वसतिगृह म्हणून खुले करून दिले . व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अहोरात्र कार्य करतात .

             

पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून  शशिकलाताई  गावतुरे यांची निवड झाल्याबद्दल  संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. रत्नमाला भोयर , झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण झगडकर , ज्येष्ठ मार्गदर्शक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , सचिव लक्ष्मण खोब्रागडे , मूल शाखेचे अध्यक्ष सुखदेव चौथाले , वृंदा पगडपल्लीवार , सुनील बावणे , प्रभा चौथाले, नागेंद्र नेवारे , वर्षा भांडारवार , गणेश मांडवकर , विजय लाडेकर , नामदेव पीजदूरकर , परमानंद जेंगठे , पंडित लोंढे , प्रशांत भंडारे , रामकृष्ण चनकापुरे , सुनील पोटे , सुरेश डांगे , संतोष मेश्राम , मंगला गोंगले यांनी सभेचे आयोजन करून अभिनंदनाचा ठराव घेत पुष्पगुच्छ  देऊन अभिनंदन केले .

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !