वॉल कंपाऊडला लावलेल्या जिवंत विद्यूत तारेला स्पर्श होऊन पाचव्या वर्गातील विद्यार्थ्याला विद्यूत शॉक लागून मृत्यू.

वॉल कंपाऊडला लावलेल्या जिवंत विद्यूत तारेला स्पर्श होऊन पाचव्या वर्गातील विद्यार्थ्याला विद्यूत शॉक लागून मृत्यू.


एस.के.24 तास


चिमुर : शेतात लागवड केलेल्या पिकांचे वण्य प्राण्यांपासून बंदोबस्त करण्याकरीता वॉल कंपाऊडला लावलेल्या जिवंत विद्यूत तारेला स्पर्श होऊन पाचव्या वर्गातील विद्यार्थ्याला विद्यूत शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज गुरूवारी चिमूर तालुक्यातील मदनापूर येथे सकाळी सहाच्या सुमारास घडली.विष्णू विनोद कामडी वय,१२ असे मृतकाचे नाव आहे. तो मदनापूर येथील रहिवासी होता.


चिमूर तालुक्यातील मदनापूर येथे रहिवासी असलेला विष्णू विनोद कामडी वय,१२ वर्ष हा स्थानिक जिल्हा परिषद शाळेत पाचव्या वर्गात शिकत होता.तो गावातील मुलांना सोबत मॉर्निंग वॉकसाठी जात होता. आज मॉर्निंग वॉकच्या वेळी सकाळी जय लहरी जय मानव विद्यालयाच्या खुल्या पंटागणात मुलांसोबत व्यायाम करीत होता.त्याला शौचालय लागल्याने पटागणाला लागून असलेल्या गोवर्धन रंदिये यांच्या शेतातील बोडी वरती शौचास गेला.तो परत येत असताना शेतकऱ्यांनी वन्यप्राणी बंदोबस्तसाठी लावलेल्या तारेला त्याचा स्पर्श झाला.त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.


सदर प्रकार अन्य मुलांना दिसल्याने त्यांनी गावात जावून माहिती दिली. सदर शेतकऱ्यांवर भादंवी 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.पोलीस उपनिरीक्षक दिप्ती मडकाम,पोलीस शिपाई मनोज तुरणकर, वाढई पोलीस शिपाई व विद्युत अभियंता रोकडे यांनी घटनास्थळी जावून मृतदेहाचा पंचनामा करून प्रेत उतरणीय तपासणी करिता चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !