भेजगाव चिचाळा मार्गावर आज दोन दुचाकी च्या अपघातात एका युवकाचा मृत्यू.
एस.के.24 तास
मुल : तालुक्यातील भेजगाव चिचाळा गावाचे दरम्यान आज दोन दुचाकीच्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला.असून एक जण जखमी झाल्याची घटना घडली. मनोज दशरथ नरुले रा मूल वय 35 असे मृत पावलेल्या युवकाचे नाव असून फुलझेले राहणार खराळपेठ असे जखमी इसमाचे नाव आहे.
मृतक मनोज नरुले हा भेजगाव चे सरपंच,अखिल गांगरेड्डीवार यांच्या कडे खाजगी ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. मनोज हा मुल वरून ट्रॅक्टर च्या ड्रायव्हर ला भेजगाव ला सोडून देण्या करिता गेला होता.
भेजगाव वरून मुल ला परत येत असताना मुल वरून फुलझेले नामक व्यक्ती आपल्या दुचाकीने कराडपेठ ला जात असताना भेजगाव समोरा समोर अपघात झाला.
अपघात भीषण झाल्याने मनोज दशरथ नरुले याचा मृत्यू झाला असून समोरील दुचाकी चालक फुलझेले हा जखमी असून उपजिल्हा रुग्णालय मुल येथे उपचार सुरू आहे.पुढील तपास मुल पोलीस करीत आहे.