भाजपा आमदार,गोपीचंद पडळकर यांच्या सेवा शक्ती संघर्ष एस.टी.कर्मचारी संघाने ७ नोव्हेंबर पासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण ची घोषणा.

भाजपा आमदार,गोपीचंद पडळकर यांच्या सेवा शक्ती संघर्ष एस.टी.कर्मचारी संघाने ७ नोव्हेंबर पासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण ची घोषणा.


एस.के.24 तास


नागपूर : भाजपा आमदार,गोपीचंद पडळकर यांच्या सेवा शक्ती संघर्ष एस.टी.कर्मचारी संघाने ७ नोव्हेंबर पासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाची घोषणा केल्याने सरकारची डोकेदुखी ऐन दिवाळीत वाढणार आहे.


आंदोलनाबाबत संघटनेकडून एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे सूचना दिली गेली आहे.या बाबत सेवा शक्ती संघटनेचे सरचिटणीस सतीश मेटकरी म्हणाले,सातव्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठते प्रमाणे वेतन श्रेणी लागू करा, नोकरीची व वेतनाची हमी सरकारने घ्यावी,शिस्त व आवेदन कार्यपद्धतीमधील जाचक अटी रद्द करा,कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करा, २०२१- २२ मधील संपकाळातील वेतन अदा करा,दिवाळी भेट द्या आणि इतरही एकूण १६ मागण्यांचे निवेदन सरकारसह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला दिले आहे.परंतु आश्वासनापलीकडे काहीही मिळत नाही.शेवटी हक्कासाठी आंदोलन करावे लागणार आहे.


मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून हे आंदोलन स्थगित केले होते. परंतु आता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसल्याने आंदोलन करणार आहे. या आंदोलनात संघाचे अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर आणि मुख्य कार्याध्यक्ष व माजी मंत्री सदाशिव खोत उपस्थित राहणार असल्याचेही मेटकरी यांनी सांगितले.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !