कडधान्य,निविष्ठा व अनुदान वाटपाचा सेवानिवृत्तीपूर्वी अहवाल सादर करावा. ★ सोशल फोरम चे प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी भंडारा यांना निवेदन.


कडधान्य,निविष्ठा व अनुदान वाटपाचा सेवानिवृत्तीपूर्वी अहवाल सादर करावा.


★ सोशल फोरम चे प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी भंडारा यांना निवेदन.


नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी


भंडारा : आर्थिक वर्ष २०१९-२० ते २०२१-२२ या कोरोना टाळेबंदी कालावधीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत १०० टक्के प्रात्यक्षिक तथा ५० टक्के अनुदानावर कडधान्य निविष्ठा व बोगस लाभार्थी अनुदान वाटपाची चौकशी करून सेवानिवृत्तीपूर्वी चौकशी अहवाल विभागीय कृषी सहसंचालक नागपूर विभाग नागपूर यांना सादर करावा. या करिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम जिल्हा शाखा भंडारा चे अध्यक्ष अरुण गोंडाने यांचे नेतृत्वात गुरुवार(ता.१६) दुपारी १:३० वाजता प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी अविनाश कोटांगळे यांना निवेदन देण्यात आले आहे. 

             

कोरोना टाळेबंदी काळात तालुका कृषी अधिकारी साकोली मार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत जांभळी/सडक येथील बोगस लाभार्थ्यांना कडधान्य वाटप व निविष्ठा आणि अनुदान वाटपाची चौकशी करून तत्कालीन कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक व संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करून वितरित केलेली रक्कम वसूल करण्यात यावी. 


या करिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम चे जिल्हा महासचिव कैलास गेडाम यांचे नेतृत्वात विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांना १० ऑक्टोबर २०२२ रोजी निवेदन देण्यात आले होते. त्याअनुषंगाने पवनी चे तालुका कृषी अधिकारी आदित्य घोगरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी निवेदनातील मागणी नुसार तक्रारदार यांचे समक्ष चौकशी केली नसल्यामुळे चौकशी अहवाल अमान्य करण्यात आला. तथा १२ सप्टेंबर २०२३ रोजी पुन्हा विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांना निवेदन देण्यात आले होते.

             

२८ सप्टेंबर २०२३ चे पत्रानुसार उपविभागीय कृषी अधिकारी के.जी. पात्रिकर यांची फेरचौकशीसाठी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण साकोली उपविभागातील प्रकरण असल्याने आपणाकडून निष्पक्ष चौकशी होणार नसल्याची शंका असल्यामुळे चौकशी अधिकारी बदलविण्यात यावा. अशी विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांना के.जी. पात्रिकर यांनी विनंती केली होती. त्यांची विनंती मान्य करून विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांनी १६ ऑक्टोबर २०२३ रोजी भंडारा चे प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी अविनाश कोटांगळे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. 


ते ३० नोव्हेंबर २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांनी सेवानिवृत्तीपूर्वी चौकशी करून चौकशी अहवाल विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांना सादर करावा.या करिता गुरुवार(ता.१६) रोजी प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी तथा चौकशी अधिकारी अविनाश कोटांगळे यांना निवेदन देण्यात आले आहे. अरुण गोंडाने,आशीत बागडे, कालिदास खोब्रागडे,प्रवीण थुलकर,डी.वाय.बडोले,सुरेश मेश्राम,अरविंद कठाने यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !