श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.रूपेश कऱ्हाडे.

श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.रूपेश कऱ्हाडे.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक.


ब्रह्मपुरी : दिनांक,०६/११/२३ स्थानिक बापूराव बुटले कला, नारायणराव भट वाणिज्य आणि बापूसाहेब पाटील विज्ञान महाविद्यालय दिग्रस येथील पदवी व पदव्युत्तर मराठी भाषा व साहित्य विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. रूपेश नरहरी कऱ्हाडे यांची भोर,पुणे येथील फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसार मंडळ आणि श्रीलंकेतील कोलंबो विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ते २४ नोव्हेंबर - २०२३ या काळात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.


डॉ.रूपेश कऱ्हाडे हे उत्तम कवी,समीक्षक,साहित्यिक आणि विचारवंत म्हणून ख्यातनाम आहेत. डॉ. कऱ्हाडे हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे कायम सदस्य आहेत. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे कुलगुरू नामनिर्देशित बाहि:स्थ विद्यापीठ स्वीकृत सदस्य म्हणून कार्यरत आहेत तसेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या विज्ञान भाषा अभ्यास मंडळाचे कुलगुरू नामनिर्देशित सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयात तसेच मलेशिया, दुबई येथील  राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवरील संमेलने, चर्चासत्रे, परिसंवादात त्यांनी शोधनिबंध सादर केलेले आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ISSN प्राप्त जर्नल्स मधून अनेक शोधनिबंध, संशोधनपर लेख प्रकाशित झालेले आहेत. 


'सृजनशोध' (वैचारिक/समीक्षा ग्रंथ), 'विस्तवासम वास्तव (काव्यसंग्रह), 'ऐंशीउत्तरी आंबेडकरवादी मराठी कथा : स्वरूप आणि समीक्षा' (समीक्षा ग्रंथ), 'साहित्य समीक्षा आणि समाज चिंतन ' (डॉ. प्रकाश खरात गौरव समीक्षा ग्रंथ - संपादित ग्रंथ),  'डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठी कविता में : आकलन आणि आविष्करण' (संपादित ग्रंथ),  'प्रश्नांची मातृभाषा : आकलन आणि समीक्षायन ' (संपादित ग्रंथ) यासारख्या ग्रंथसंपदा सृजनशिल केलेल्या आहेत. डॉ. कऱ्हाडे यांना विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

 

'सृजनशोध ' हे १८ वैचारिक लेखसंग्रहाचे पूर्ण पुस्तक उस्मानिया विद्यापीठ हैदराबादच्या एम. ए. भाग २ , 'वैचारिक साहित्य ' या पेपर साठी भाषा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे.


बुटले महाविद्यालयाच्या ६० वर्षांच्या इतिहासात आंतरराष्ट्रीय पातळीवरील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्राध्यापकाला पहिल्यांदाच प्राप्त झालेले आहे. प्रोफेसर डॉ.कऱ्हाडे हे आपल्या मराठी विषयाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी सातत्यानं करीत असतात. आपल्या स्वतःच्या आणि महाविद्यालयाच्या ॲकेडमिक विकासाची वाटचाल सातत्याने करीत राहण्याचा प्रयत्न नेहमी करतात. त्याचप्रमाणे प्रोफेसर डॉ.रूपेश कऱ्हाडे हे बुटले महाविद्यालयाचे मराठी भाषा व साहित्य विषयावर प्रभुत्व असलेले प्रचंड विद्यार्थी प्रिय आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असणारे प्राध्यापक म्हणून ख्यातनाम आहेत.


उपरोक्त महत्त्वपूर्ण सन्मान बापूराव बुटले महाविद्यालयाच्या  आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमत: प्राप्त करणारे प्राध्यापक म्हणून प्रोफेसर डॉ. रूपेश नरहरी कऱ्हाडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. डी.व्ही.एस.पी. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री विजयकुमारजी बंग, श्री श्याम भाऊ महिन्द्रे पाटील तथा डॉ.श्री.अभय पाटील सचिव, डी.व्ही.एस.पी. मंडळ, डॉ.श्री प्रदीपजी मेहता उपाध्यक्ष, डी.व्ही.एस.पी. मंडळ, कोषाध्यक्ष, श्री रघुराजसिंग चौहान तसेच डी.व्ही.एस.पी. मंडळाचे इतर सर्व पदाधिकारी यांनी प्रोफेसर डॉ.रूपेश कऱ्हाडे यांचे हार्दिक अभिनंदन केले. 


महाविद्यालयाच्या आणि नॅक मूल्यांकनाच्यादृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची व सन्माननीय बाब असल्याने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरविंद लाडोळे तसेच वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद,सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रंथालय कर्मचारी यांनीही प्रोफेसर डॉ.रूपेश कऱ्हाडे यांचे हार्दिक अभिनंदन केले आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !