कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पळाला,कारागृहात एकच खळबळ.

कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पळाला,कारागृहात एकच खळबळ.


विशाल बांबोळे - कार्यकारी संपादक


पुणे : मागील महिन्यापासून पुण्यातील येरवडा कारागृह चर्चेचा विषय ठरला आहे.ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात येरवडा कारागृहाची जोरदार चर्चा झाली. त्यानंतर माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी देखील येरवडा कारागृह प्रकरणावरून अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे.


पुण्यातील येरवडा कारागृहातून पुन्हा एकदा कैदी पळाल्याची घटना घडली आहे.कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधून पळाला  आहे.त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्निचिन्ह उपस्थित झालं आहे. कारण येरवडा तुरूंगात अनेक मोठ मोठ कैदी तुरूंगवास भोगत असतात.त्यामुळे तुरूंगातील सुरक्षा ही अत्यंत कडक असायला हवी. परंतु कैदी पळून जात असताना यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दातील एका खुनाच्या गुन्हात २००८ पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. जाधव याला येरवडा कारागृहातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. काल दुपारच्या सुमारास कारागृहातील बंदी यांची तुरूंग अधिकारी गिनती करता वेळेस आरोपी आशिष जाधव हा कारागृहातील अधिकाऱ्यांना आढळून आला नसल्याने एकच खळबळ उडाली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !