ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा शेतात गेलेल्या महिलेवर वाघाच्या हल्ला ; महिला जागीच मृत्यू.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.ही घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा शेतशिवारात घडली. सायत्राबाई नामदेव कामडी असे मृत महिलेचे नाव आहे.
ब्रह्मपुरी दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या हळदा गावातील शेतात आज (दि.१) सकाळी सायत्राबाई या काम करण्यासाठी गेल्या होत्या.हळदा शेतशिवार जंगलाने व्याप्त असल्याने या परिसरात वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी घरी परत येताना दबा धरुन बसलेल्या वाघाने सदर महिलेवर हल्ला केला.यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या परिसरात पिकांची लागवड करण्यात आली आहे. सध्या पीक कापणीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सकाळपासून सायंकाळ पर्यंत महिला शेतात काम करतात.जंगल परिसरात शेत असल्याने महिला जीव मुठित घेवून काम करतात.चंद्रपूर जिल्ह्यात मानव आणि वाघ याचा संघर्ष पाहायला मिळत आहे.
आतापर्यंत बऱ्याच नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.चिमूर तालुक्यात चोवीस तासात दोघांना वाघाच्या हल्ल्यांत जीव गमवावा लागला आहे.याचा पुढील तपास वनविभाग ब्रम्हपुरी करीत आहे.