बाजार टोली आरमोरी येथे वाढदिवशी तलवारी ने केक कापणे पडले महागात.
★ चार आरोपी अटकेत ; एक जण फरार.
एस.के.24 तास
आरमोरी : वाढदिवशी रस्त्यावर हुल्लडबाजी करीत तलवारीने केक कापणे काही तरुणांना चांगलेच महागात पडले असून समाज माध्यमावर चित्रफीत सार्वत्रिक होताच पोलिसांनी पाच युवकांवर गुन्हे दाखल केले आहे.
केक कापण्यासाठी वापण्यात आलेली तलवार आणि आरोपींच्या गाड्या देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे.
1) लोकेश विनोद बोटकावार वय,२२वर्ष 2) लोकमित्र खुशाल ठाकरे वय,२५वर्ष 3) बादल राजेंद्र भोयर वय,२३वर्ष 4)पवन मनोहर ठाकरे वय,२५वर्षं 5)राहुल मनोहर नागापुरे वय,२८ वर्ष (फरार)
सर्व राहणार बाजार टोली आरमोरी अशी आरोपींची नावे आहेत.
आरमोरी शहरा लगत बाजार टोली आरमोरी रामाळा मार्गावर २५ नोव्हेंबर रोजी रात्री ११ ते १२.३० वाजता दरम्यान वरील आरोपी तरुणांनी मित्राच्या वाढदिवशी हुल्लड बाजी करीत तलवारीने केक कापले.दरम्यान,त्यांनी या घटनेचे आपल्या मोबाईल मध्ये चित्रीकरण केले.सदर चित्रफीत समाज माध्यमावर सार्वत्रिक झाली.यात आरोपी तरुण हातात तलवार घेऊन केक कापत असल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या निर्देशानुसार आरमोरी पोलिसांनी तत्काळ पावले उचलत संबंधित तरुणांवर हत्यार प्रतिबंधित कायद्यानुसार कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले.
यातील राहुल नागापुरे फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.