समर्थ महाविद्यालयात पालक व माजी विद्यार्थी मेळावा संपन्न.
नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी,भंडारा
भंडारा : समर्थ महाविद्यालय लाखनी येथे दि, 3/11/2023 रोज शुक्रवारला पालक व माजी विद्यार्थी संमेलन घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर तर प्रमुख अतिथी म्हणून घनश्याम खेडीकर, उमराव बावनकुळे, देवाजी पडोळे, अतुल भंडारकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे, पालक शिक्षक संघाचे कार्यवाह डॉ सुरेश बनसपाल, माजी विद्यार्थी संयोजक डॉ धनंजय गभणे उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजमितीपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले, त्यांचे मनोगतातून अनेक माजी विदयार्थ्यांनी यशोगाथा विशद केली. महाविद्यालय भविष्यात मोठ्या उचीवर पोहचावे असा आशावाद व्यक्त करीत महाविद्यालयाने समाजिक जाणीव निर्माण करणारा विद्यार्थी घडवावा व विविध सुविधा द्यावी ही अपेक्षा माजी विद्यार्थीनी व्यक्त केली.
यावेळी पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना धाडविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना सजग करावे ही विनंती केली.कार्यक्रमाचे संचालन डॉ,संगीता हाडगे,प्रास्ताविक डॉ,धनंजय गभणे,आभार डॉ सुरेश बन्सपाल यांनी केले.