टायगर ग्रुप सावली तर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
एस.के.24 तास
सावली : रक्तदान हेच श्रेष्ठदान असून टायगर सावली तर्फे मा.पै.डॉ.तानाजी भाऊ जाधव राष्ट्रीय अध्यक्ष टायगर ग्रुप यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.02/11/2023 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय सावली येथे रक्तदान शिबिर व फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला व मा. डॉ. तानाजी भाऊ जाधव यांना व्हिडिओ कॉल द्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमा प्रसंगी ग्रामीण रुग्णालय सावली वैद्यकीय अधीक्षक डॉ.वाघधरे साहेब यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन प्रधान केले या कार्यक्रमाचे आयोजक टायगर ग्रुप तालुका प्रमुख सावली आर्यन डोंगरे,मोसम बुर्रीवार,मौसम आत्राम,भीमराव दुधे, हेमंत बुर्रीवार,कुणाल आळे,सुग्रीव ढोले,आदित्य आत्राम, प्रज्वल डोंगरे,चेतन देशमुख,यश डोंगरे,निकेश नर्मलवार सुनील किनेकर,किशोर बोरकुटे,संतनु सोयाम,अभय घोटेकर आदी उपस्थित होते.
यावेळी रक्तदानाचे महत्त्व सांगताना रक्तांचे महत्त्व तेव्हाच कळते जेव्हा त्याची गरज पडते असे आवाहन टायगर ग्रुप तालुका प्रमुख आर्यन डोंगरे यांनी केले