परिश्रम भवनात रंगले झाडीबोलीचे कविसंमेलन. ★ झाडीपट्टी साहित्यिक,लोक कलावंतांचा विशेष पुरस्काराने गौरव.


 परिश्रम भवनात रंगले झाडीबोलीचे कविसंमेलन.


★ झाडीपट्टी साहित्यिक,लोक कलावंतांचा विशेष पुरस्काराने गौरव.


एस.के.24 तास


गडचिरोली : झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने नुकतेच विदर्भस्तरीय झाडी कविसंमेलन घेण्यात  आले.तसेच झाडीपट्टीतील कवी लेखक लोककलावंताना सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोलीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवनाथजी कुंभारे यांनी दीप प्रज्वलित करून केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ग्रामगीताचार्य तथा ज्येष्ठ साहित्यिक बंडोपंत बोढेकर विराजमान होते.


 या प्रसंगी प्रमुख पाहुणेे म्हणून आरमोरी येथील नायब तहसिलदार धनंजय वाकुलकर,गडचिरोली झाडीबोली मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ.चंद्रकांत लेनगुरे,ग्रामीण चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष तथा साहित्यिक अरूण झगडकर,मुल च्या ज्येष्ठ कवयित्री सौ.शशिकला गावतुरे,भारतीय जीवन विमा निगमचे सी.एल.क्लब मेंबर दिलीप उडान,सुप्रसिद्ध कव्वाल वामनदादा गेडाम, कवयित्री मालती सेमले विराजमान होते.


मंडळाच्या वतीने मागविण्यात आलेल्या प्रस्तावातून निवड समितीने पुस्तकांची पुरस्काराची निवड केली .त्या पुस्तकांच्या  लेखकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.झाडीबोलीतील काव्यसंग्रह पुरस्कारासाठी कवी मुरलीधर खोटेले यांच्या मातीतूना अबारात पुस्तकास; प्रमाण मराठीतील कविता संग्रहाकरिता  मौनाचे अस्तर,या पुस्तकास-  कवयित्री शितल कर्णेवार ; वैचारिक पुस्तक पुरस्कार 

रान झुलवा या पुस्तकास

(दिवंगत लेखक पितांबर कोडापे) आणि झाडीपट्टी 

लोककलावंत पुरस्कारासाठी सुप्रसिद्ध शाहीर

लोकराम शेंडे या चौघांना मान्यवरांच्या हस्ते शाल,  श्रीफळ,गौरवचिन्ह,१००१/- रुपये रोख रक्कम प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

     याप्रसंगी ३१ व्या झाडी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांचा तसेच गडचिरोलीतील ज्येष्ठ गझलकार वामनदादा गेडाम आणि कवयित्री मालती सेमले यांचा सुध्दा शाल, स्मृती चिन्ह देऊन मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.


सत्कारानंतर लगेच कविसंमेलन घेण्यात येऊन यात लक्ष्मण खोब्रागडे,अर्पणा नैताम,संजय कुनघाडकर,देवेंद्र मुनघाटे,अँड.संजय ठाकरे मंदाकिनी चरडे,निधी गडकरी,संगीता गडकरी,शशिकला गावतुरे,कन्हैय्या मेश्राम,तुषार मेश्राम,पुनाजी कोटरंगे,भारत मेश्राम, प्रभाकर मेश्राम,योगेश गोहणे,सुरेखा बारसागडे,संजीव बोरकर,प्रिती चाहंदे, आनंदराव बावणे,प्रतिक्षा कोडापे,वर्षा राजगडे, पुरूषोत्तम ठाकरे, उपेन्द्र रोहणकर, डॉ.चंद्रकांत लेनगुरे, वामनदादा गेडाम,मारोती आरेवार,कमलेश झाडे,विनायक धानोरकर,डॉ.प्रवीण किलनाके आदी ३६ कवींनी आपल्या कविता सादर केल्या.विविध विषयावरील कविता ऐकतांनी रसिक वर्ग मंत्रमुग्ध झाला होता.

    

प्रा.विनायक धानोरकर यांनी प्रास्ताविकेतून गडचिरोली झाडीबोली मंडळाने आजपर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेतला.पहिल्या सत्रातील पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे   सूत्रसंचालन कवी संजीव बोरकर यांनी केले. तर  कविसंमेलनाचे सुत्रसंचालन गझलकार मारोती आरेवार व डॉ.प्रवीण किलनाके या दोघांनी केले. तर उपस्थितांचे आभार  उपेंद्र रोहणकर यांनी मानले. 


मंडळाचे सदस्य कवी कमलेश झाडे,प्रतिक्षा कोडापे, पुरूषोत्तम ठाकरे,प्रेमिला अलोने,जितेंद्र रायपुरे,गजानन गेडाम, विलासराव निंबोरकर आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमास प्राचार्य पंडीत पुडके, जितेंद्र मोरे (कोल्हापूर) आदींची उपस्थिती होती.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !