सावली तालुक्यात लष्करी अळी चा प्रादुर्भाव. ★ नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करा.- नितीन गोहने,अध्यक्ष सावली तालुका काँग्रेस कमिटी. ★ तहसीलदार साहेब व तालुका कृषी अधिकारी सावली यांना निवेदन.



सावली तालुक्यात लष्करी अळी चा प्रादुर्भाव.


★ नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करा.- नितीन गोहने,अध्यक्ष सावली तालुका काँग्रेस कमिटी.


★ तहसीलदार साहेब व तालुका कृषी अधिकारी सावली यांना निवेदन.


एस.के.24 तास


सावली : दिनांक:- २१नोव्हेंबर २०२३ तालुक्यातील शेतकरी बांधवांचे शेतीमधील मुख्य उत्पादनाचे पिक म्हणजे धान/भात शेती हे आहे व सध्या धान या पिकाच्या कापणीला सुरुवात झालेली असून उभ्या धानाला व कापणी चालू असलेल्या धान पीकाला लष्करी अळी, कळा-करपा, मानमोळी या रोगामुळे धान पिकाचे लोंबा झडत असल्याने हातात आलेले पीक जाण्याचे संकट ओढावत आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी बांधवाना त्रास सहन करावा लागत आहे.

 

 काही दिवसापूर्वी  मावा तुडतुडा, खोड किडा सारखे अनेक रोगाची लक्षणे होती मात्र त्यावर वेळीच उपचार झाल्याने काही प्रमाणात आटोक्यात आले मात्र सध्या लष्करी अळी,कळा-करपा, मानमोळी या रोगामुळे धान पीकाचे ४०-५०%  नुस्कान होत असून कृषी विभागाने त्यासंबधित विशिष्ट उपाययोजना सांगावे, व शेतकऱ्यांच्या झालेल्या धान पिकांचे नुकसान पंचनामे करून लवकरात लवकर शेतकर्यांना आर्थिक नुसकान भरपाई मिळण्याकरिता सहकार्य करावे अशी मागणी सावली तालुका काँग्रेस कमेटीतर्फे करण्यात आली आहे.


यावेळी निवेदन देताना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे,माजी सभापती पंचायत समिती सावली मा.विजय कोरेवार,सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार,सावली तालुका युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.किशोर कारडे, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष मा.अमर कोणपत्तीवार, उसेगावचे सरपंच मा.चक्रधर दुधे, बोथली चे उपसरपंच मा.नरेश पाटील गड्डमवार,जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते मा.प्रशांत राईंचवार,माजी उपाध्यक्ष न.प.मा.भोगेश्वर मोहुर्ले,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.नानाजी तावाडे,मा.जगदीश वासेकर, यश गेडाम तसेच आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


रोगराईमुळे सावली तालुक्यातील ४०-५० टक्के शेतकऱ्यांचे मोठे नुसकान झाले असून त्यांना लवकरात लवकर कृषी पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी प्रशासनास तहसीलदार साहेब व तालुका कृषि अधिकारी सावली यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे- मा.नितीन गोहने,अध्यक्ष सावली तालुका काँग्रेस कमिटी.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !