महाराष्ट्रतील २७ हजार ग्रामंचायतीमध्ये पारदर्शक राबविले जात आहे सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया. ★ वरोरा तालुक्याील ग्रामपंचायतचे सामजिक अंकेक्षण प्रक्रिया सुरू.

महाराष्ट्रतील २७ हजार ग्रामंचायतीमध्ये पारदर्शक राबविले जात आहे सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया.


★ वरोरा तालुक्याील ग्रामपंचायतचे सामजिक अंकेक्षण प्रक्रिया सुरू.


एस.के.24 तास


वरोरा : महाराष्ट्र राज्य सामजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई -३२ अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम - २००५ अंतर्गत सन २०२२ व २०२३ चे वरोरा तालुक्यातील सर्व ८१ ग्रामपंचायत चे समाजिक अंकेक्षण प्रक्रिया एका ग्रामपंचायत ला आठ दिवस निवासी राहून सबंधित विभागाचे लेखेजोखे पाहून, प्रत्यक्ष कामाची पाहणी, मोजमाप करुन गावांतील नागरिकांच्या ग्रामसभा समक्ष पडताळणी करून सामजिक अंकेक्षण प्रक्रिया पारदर्शक पार पाडली जात आहे.महाराष्ट्रतील १३ जिल्हयात जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत ग्राम साधन व्यक्ती नियुक्त करण्यात आलेले असून त्यामधील ३० तालुक्यातील जवळपास २७ हजारच्या वर ग्रामपंचायतीमध्ये ग्राम साधन व्यक्तीच्या माध्यमातून सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया पारदर्शक राबविली जात आहे. या ग्राम साधन व्यक्तीना चार दिवस निवासी प्रशिक्षण प्रशिक्षकामार्फत देण्यात आलेले आहे. या साधन व्यक्ती मार्फत जिल्हयातील राजुरा, जिवती, वरोरा या तिन तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर ग्राम साधन व्यक्ती मार्फत सामजिक अंकेक्षण प्रक्रिया राबविली जात आहे.  हि प्रक्रिया पारदर्शक पार पाडण्याची जबाबदारी जिल्हा साधन व्यक्तीच्या खांद्यावर आहे.


यात वरोरा तालुक्यातील खांबाडा अंतर्गत बारव्हा, वडगाव,  नागरी, तुमगाव अश्या १८ ते २० गावांतील ग्रामपंचायत मध्ये निवासी राहून सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया राबविली जात आहे. यावेळी गावांतील सर्व महीला पुरुष यांच्या गटसभा, गावसभा, घेऊन रोजगार हमी योजनेच्या कामाबाबद ग्राम साधन व्यक्तीच्या माध्यमातुन गृहभेटी, महीला सभा व लोकसहभागाचा तंत्र वापरून, रोजगार हमी योजनेचा प्रसार आणि प्रचार केला जात आहे. 

     

या सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया मार्फत गावात झालेल्या  कामाचे मूल्यमापन ग्रामसभा मार्फत गावांतील नागरिकांच्या माध्यमातुन केले जात आहे. यावेळी बारव्हा,वडगाव, तुमगाव येथे ग्राम साधन व्यक्ती विलास चौधरी,प्रमोद राऊत, निराशा साव,श्वेता रामटेके,धरमदास नागोसे,सागर जांभूळे, इत्यादी ग्राम साधन व्यक्ती निवासी उपस्थित होते. मात्र यांच्यावर सुद्धा पाळत ठेऊन सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया पारदर्शक केली जात आहे की, नाही यासाठी समूह साधन व्यक्ती स्वप्निल मजगवळे च्या माध्यमातुन बारीक लक्ष ठेवले जात असून, या समूह साधन व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी तालुका साधन व्यक्ती तर तालुका साधन व्यक्तीवर जिल्हा साधन व्यक्ती विकास मोहूर्ले यांचे मार्फत लक्ष ठेवले जात असून हि प्रक्रिया पारदर्शक राबवली जात आहे.


सदर प्रक्रिया पारदर्शक यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच तसेच ग्रामपंचायत कमिटी व ग्रामपंचायत सचिव गोविंदा ठोंबरे, ग्राम रोजगार सेवक संजय ढोबळे,तथा ग्रामपंचायत कर्मचारी सहकार्य करुन लागणारे सर्व कागदपत्र उपलब्ध करून दिले जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !