विना परवाना रेतीची वाहतूक करणारा टिप्पर रंगेहाथ पकडला ; पोलिस निरीक्षक कोकाटे यांची कारवाई.
नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी,भंडारा
भंडारा : रात्रीच्या सुमारास वैनगंगा नदी घाटातून अवैध रित्या विना परवाना रेतीची चोरटी वाहतूक करीत असलेला टिप्पर रंगेहाथ पकडून त्यावर कारवाई करण्यात आली.सदरची कारवाई ४ नोव्हेंबर रोजी २ वाजता च्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील ईटान रोड विरली/बू येथे लाखांदूर चे पोलिस निरीक्षक,रमाकांत कोकाटे यांनी केली. या घटनेतील टिप्पर चालक मालक दोघां विरोधात लाखांदूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून रंगेहाथ पकडलेला टिप्पर लाखांदूर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. लाखांदूरचे पोलीस निरीक्षक,रमाकांत कोकाटे यांनी केलेल्या कारवाईने रेती तस्करांमध्ये चांगलीच धडकी भरल्याचे बोलले जात आहे.
टिप्पर चालक अविनाश रायभान रामटेके वय,२५ रा. ढोबरा ता.उमरेड जी.नागपूर तर टिप्पर मालक प्रज्वल आंभोरे वय २५ रा.अजनी ता.कुही जी.नागपूर अशी घटनेतील गुन्हा दाखल झालेल्या आरोपीतांची नावे आहेत.
पोलिस सूत्रानुसार,लाखांदूर तालुक्यातील नदी घाटातून गत अनेक महिन्यांपासून अवैध रेतीचा उपसा करून ट्रॅक्टर व टिप्परच्या सहाय्याने वाहतूक केली जात असल्याची ओरड आहे.या माध्यमातून शासनाच्या लाखो रुपयांच्या महासुलावर डल्ला मारला जातो. तालुक्यातील नांदेड व मोहरना रेतिघाटांना डेपोची परवानगी मिळाली असली तरी सद्यस्थितीत ते बंद आहेत. तर, या घाटातून सुद्धा रेतीची विना परवाना अवैध वाहतूक केली जात असल्याची ग्रामस्थांकडून ओरड होती.
दरम्यान, ४ नोव्हेंबर रोजी लाखांदूर पोलिस विरली/बू परिसरात गस्तीवर असताना रात्री २ वाजताच्या सुमारास निळ्या पांढऱ्या रंगाचा टाटा सिग्मा कंपनीचा एम एच ४० सी एस ७३३९ क्रमांकाचा टिप्पर मध्ये अवैधरीत्या ९ ब्रास रेती चोरी करून वाहतूक करतांना रंगेहाथ मिळाला. सदर टिप्पर नांदेड नदी घाटातून रेती भरून जात असल्याची महिती आहे.
यावेळी, लाखांदूर चे पोलिस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांनी वाटेत पकडलेला टिप्पर जप्त करीत लाखांदूर पोलिस स्टेशन मध्ये जमा करण्यात आला असून रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा पुढील तपास लाखांदूर चे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.