ने.हि.महाविद्यालयात माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी जयंती संपन्न.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रह्मपुरी : दिनांक,19/11/23 येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात भारताचे माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी जयंतीचा कार्यक्रम प्राचार्य डॉ डी एच गहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
सर्व प्रथम स्व.इंदिरा गांधीच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ गहाणेंनी माल्यार्पण करुन अभिवादन केले.यानंतर कला शाखाप्रमुख डॉ राजेंद्र डांगे,प्रवीण माळे, गोपाल,भैयालालजी व उपस्थितांनी पुष्प वाहून आपली आदरांजली वाहिली.
यशस्वीतेसाठी जयंती - पुण्यतिथी समिती प्रभारी डॉ कुलजित शर्मा व सदस्यांनी परिश्रम घेतले.