माहीती अधिकारांचा गैरवापर करून ब्लॅकमेल करणाऱ्यावर कारवाई करावी. ★ अन्यता उपोषणाला बसणार सामाजीक कार्यकर्ता,उमेश मडावी



माहीती अधिकारांचा गैरवापर करून ब्लॅकमेल करणाऱ्यावर कारवाई करावी.


★ अन्यता उपोषणाला बसणार सामाजीक कार्यकर्ता,उमेश मडावी


 एस.के.24 तास 


गडचिरोली : माहीती अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहीती अधिकारांचा गैरवापर करून अधिकारी व कर्मचारी यांना ब्लॉक मेल करण्याचा गोरख धंदा कांहीं महाभागांनी चालविला असुन यात अधिकारी व कर्मचारी भरडल्या जात आहेत. अश्यातच धुंडेशिवणी येथील कथाकथीत एक व्यक्ती मी सामाजीक कार्यकर्ता आहे अशा बुरखा पांघरुण वनविभाग ' पोलीस विभाग , RTO विभाग ' बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांकडे वसुली करीता जात असतो सदर कर्मचारी व अधिकार्‍याने पैसे दिले नाही तर त्याच्या सोबत हुज्जत घालुन त्यांचा विरोधात माहीतीचा अधिकार म्हणुन माहीती मागण्याचा प्रयत्न करतो. 


इतकेच नव्हे तर अॅक्ट्रोसिटी चा धाक सुद्धा दाखवायला मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे विशेषता वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी धास्तावले असुन त्याचे चांगलेच फावत आहे. काही अधिकारी धमक्यांना बळी पडत असल्यामुळे लाखो रुपयाची घेवाण सदर व्यक्ती करीत आहे. सदर व्यकीनी अनेक ठिकाणी उद्रेक माजविला असुन असे बोलल्या जाते की अमिर्झा येथील एक शिक्षक यांना माहीती पुरवुन सहकार्य करीत असतो.


विशेष म्हणजे सदर व्यक्तीला उत्पनाचा कोणताच स्त्रोत नसनांना दररोज एका व्यक्तीला टु व्हिलर मागे बसवून स्वतः सुट - बुटात काळी - निळी जॉकीट लावून सामाजीक कार्यकर्ता आहे असा ढेभा मिरवून कार्यालयात जात असतो. अश्या प्रकारची तक्रारही उमेश मडावी यांनी आपल्या निवेदनाद्वारे दिलेली आहे. 


एखाद्या व्यक्तीने वर्षातुन सात पेक्षा जास्त वेळा माहीती अधिकार म्हणुन अर्ज दिल्यास त्याचा हेतू दृष्ट असल्याचा तो कारवाईस पात्र असल्याचे न्यायालयाचा आदेश दिलेला आहे.त्यामुळे अश्या प्रकारची माहीती अधिकार अधिनियमाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीची चौकशी करावी व त्याचे.विरुद्ध गुन्हा नोंदवांवा अन्यता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली समोर उपोषणाला बसण्याचा ईशारा सामाजीक कार्यकर्ता,उमेश मडावी गडचिरोली यांनी दिलेला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !