ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे संविधान दिन साजरा. - सरपंच ॲड.शर्मिला रतनकुमार रामटेके यांचा पुढाकार
एस.के.24 तास
नागभीड : भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत नवेगाव पांडव या गावामध्ये ग्रामपंचायतींच्या वतीने संविधान प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी सकाळी गावात फेरी काढून संविधान दिनाची जनजागृती करण्यात आली.
या निमित्ताने उपस्थित प्रा.संजय मगर सर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाल्य अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये बाबासाहेब संविधान प्रदान करतानाच्या महापुरुषांच्या फोटो ला व संविधानाच्या उदेशीकेला पुष्पमाल्य अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ने.ही. विद्यालय नवेगाव पांडव च्या विद्यार्थिनींनी संविधान जागर पथनाट्या च्या माध्यमातून उपस्थित लोकांना संविधान सोप्या पद्धतीने समजून दिले.विद्यालयाचे शिक्षक सतिश डांगे व शिवदास बुल्ले यांनी या पथनात्यासाठी सहकार्य केले.सदर कार्यक्रमाची प्रस्तावना सरपंच ॲड.शर्मिला रामटेके यांनी केले व संविधानाचे महत्व समजावून सांगितले .यावेळी संविधान दिवसाचे औचित्य साधून गावांसाठी नेहमी सहकार्य व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचे सत्कार करण्यात आले. गावातील जि.प. प्राथमिक शाळा, नेवजाबाई हितकारीनी विद्यालय,धर्मराज विद्यालय विध्यार्थी नेहमी गावाची स्वच्छता, सहकार्य करतात म्हणून तीनही शाळेचे मुख्याध्यापक याचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.तसेच शिक्षक श्री.राहुल फटाले,मा.कमलाकर पांडव यांना यावेळी गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मा.प्रा. संजय मगर सर यांनी समाजासाठी बाहेर निघून काम करावं लागेल,समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम करावे लागेल तसेच शिक्षित व नोकरदार लोकांची जास्त जबाबदारी आहे आहे हे समजून घ्यावे लागेल असे मत मांडले. त्यानंतर दुसरे मार्गदर्शक डॉ.पुणम घोणमोडे यांनी आपल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एकाच जातीचे नसून इथल्या स्त्रियांचे, वंचितांचे, कामगाराचे , आदिवासींचे नेते आहेत असे सांगितले. यावेळी उपस्थित मा.राजश्री झोडे मैडम यांनी सुध्दा खुप मोलाचे मार्गदर्शन केले.
ह्या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बन्सीलाल चूर्हे तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच विजय बोरकुटे,रितेश पांडव,सौ.कल्पना नवघडे,सौ.मिराबाई मसाखेत्री, सौ.निरंजना सोनटक्के, सौ.देवकन्या पा़डव आदी सदस्यगण ग्रामपंचायत नवेगाव पांडव तसेच माजी शिक्षक दिवाकर नवघडे.मा.पांडुरंग रामटेकेश्री.कोराणकर सर,श्रि.बाळकृष्ण पांडव सर,श्रि.नरेंद्र चुर्हे सर शाळेतील शिक्षक वृंद,आंगणवाडी सेविका, मदतनीस,सि.आर. पी बचतगट,प्रतिष्ठित नागरिक महिला पुरुष,विध्यार्थी व विध्यार्थींनी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम श्री. विजय नवघडे,श्री.अतुल पांडव यांनी केले.कार्यक्रमाचे सु्त्र संचालन मुनिराज कुथे सर यांनी केले तर आभार कोराणकर सर यांनी केले.