नविन मतदार नोंदणी करीता विशेष शिबिर.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यात १८ वर्षांवरील युवक युवतींसाठी ज्यांनी मतदार नोंदणी केलेली नाही त्यांच्यासाठी दिनांक ४/५ नोव्हेंबर २०२३ आणि २५/२६ नोव्हेंबर २०२३ ला विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर अशी सुविधा नवमतदारांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तरी १८ वर्षांवरील सर्व युवक युवतींनी या शिबीराचा लाभ घेऊन मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी असे आवाहन मा. तहसीलदार यांनी केले आहे. तसेच नोंदणीसाठी जाताना जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, पैन कार्ड, वाहन चालक परवाना, टी.सी. यापैकी कोणताही एक पुरावा आणि फोटो न्यावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत.