शिक्षण महर्षीचा उत्तुंग प्रवास म्हणजे ' वेलू गेला गगनावरी ' चरित्रग्रंथ.
★ प्राचार्य डॉ मोहरकर : स्व.खिमाजी नाईक पुण्यतिथी महोत्सव.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
जिवती : दिनांक,०४/११/२३ " पहाडावरील जिवती या आदिवासीबहुल विभागात अनेक समस्या आहेत.येथे शिक्षणाची गंगा निर्माण करणे फार कठीण कार्य होते.ही गरज ओळखून तुकारामजी पवारांनी सर्वांसाठी विद्येचे महाद्वार येथे खुले केले.
आई - वडिलाच्या पुण्याईने या शिक्षणसंस्था आज बहरल्या. अनेक विद्यार्थी घडले,याचे श्रेय या कष्ट वेचणा-या तुकाराम पवारांना जाते.त्यांचा जीवनपट डॉ राजकुमार मुसणे सरांनी ' वेलु गेला गगनावरी मधून उलगडला आहे.हा चरित्रग्रंथ म्हणजे एका शिक्षणमहर्षीचा उत्तुंग जीवनप्रवास आहे " असे विवेचन प्रसिद्ध समीक्षक प्राचार्य डॉ. श्याम मोहरकरांनी केले.
स्व.खिमाजी पवार नाईक यांच्या २७ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने पिट्टीगुडा, ता.जिवती येथे आयोजित श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव दलितमित्र माननीय तुकारामजी पवार यांच्या जीवनावरील ' वेलू गेला गगनावरी ' या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी खासदार, भंडाराचे मधुकरराव कुकडे होते तर यावेळी राष्ट्रीय समाज प्रबोधनकार कीर्तनसम्राट ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर ,सती सामत दादा देवस्थान वडांगळी, जिल्हा नाशिकचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण, भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्थेचे राष्ट्रीय महासचिव मा.अशोक राठोड,गोंडवाना विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य तथा विद्यमान मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. परमानंद बावनकुळे.
गोंडवाना विद्यापीठ मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य,कवी डॉ.धनराज खानोरकर,दलित मित्र पुरस्कार प्राप्त शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे मा.तुकारामजी पवार त्यांच्या सहचरिणी सौ.सुनिताताई पवार,माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँगेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेश सचिव डॉ.पंकज पवार,लेखक प्रा.डॉ.राजकुमार मुसने,स्वप्नील पवार,अरूणजी काकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व भूमिका आयोजक तुकारामजी पवारांनी मांडली.सूत्रसंचालन डॉ राजकुमार मुसणें नी केले तर डॉ.पंकज पवारांनी आभार मानले.यानंतर प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंदोरीकर महाराजांचे जाहिर प्रबोधनपर कीर्तन झाले.