काँग्रेस जनसंपर्क कार्यालय सावली येथे पंडित जवाहलाल नेहरू जयंती साजरी.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
सावली : दिनांक,१४ नोव्हें.२०२३ स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्ताने मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार जनसंपर्क तथा तालुका काँग्रेस पक्ष कार्यालय सावली येथे पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार व फुले अर्पित करून अभिवादन करण्यात आले.
पंडित नेहरू हे एक प्रख्यात नेते आणि स्वातंत्र्यसेनानी होते.त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी कठोर संघर्ष केला आणि १९४७ मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून काम पाहिले.आपल्या राजवटीच्या काळात त्यांनी मुलांना सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. मुले या राष्ट्राचे भविष्य आहेत या मतावर त्यांचा विश्वास होता पंडित नेहरू एकदा म्हणाले होते की आजची मुले उद्याचा भारत निर्माण करतील.
ते ज्या पद्धतीने शिक्षण घेतील त्यावर देशाचे भविष्य निश्चित होईल.म्हणूनच, या दिवशी मुलांचा दिवस हा देशातील प्रत्येक मुलास समान हक्क, सुरक्षितता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी साजरा केला जातो.
यावेळी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मान.विजय मुत्यालवार,सावली नगर पंचायतीच्या अध्यक्षा सौ.लताताई लाकडे,सावली शहर युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.अमर कोणपत्तीवार,जेष्ठ कार्यकर्ते मा.प्रशांतजी राईंचवार,सावली शहर महिला अध्यक्षा सौ.भारती चौधरी,बांधकाम सभापती सौ.साधनाताई वाढई,आरोग्य,स्वच्छता व पाणीपुरवठा सभापती मा.अंतबोध बोरकर,नगरसेवक मा.प्रितम गेडाम,नगरसेवक मा.सचिन सांगिडवार,सौ.कविता मुत्यालवार काँग्रेस जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम,मा.राजू बुरीवार,बादल गेडाम,यश गेडाम आदी उपस्थित होते.