अंगणवाडी सेविका,मदतनीस व परिचारिका ह्या खऱ्या समाजसेविका. - आ.बंटी भांगडिया
चिमूर : भांगडीया फाऊंडेशनच्या वतीने दिवाळी निमित्त चिमुरात आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, मदतनीस व परिचारिकांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रम प्रसंगी आमदार बंटी भांगडिया म्हणाले की, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस व परिचारिका ह्या खऱ्या गावांतील समाजसेविका आहेत.
असे यावेळी सांगीतले. कोरोना काळात सगळ्यांवर घराबाहेर न पडण्याचे शासकीय बंधन होते. कोरोनाच्या साथीमध्ये अनेकांनी आपले जीव गमावले. कोरोनाच्या रुग्णांची ओळख पटवणे, सर्व्हे करणे,औषधोपचार करणे, शासनाने नेमून दिलेली अन्य कामे करणे, अशी जोखमीची सर्व कामे स्वतःचा जीव धोक्यात घालून आशा स्वयंसेवीका, अंगणवाडी सेविका, मदतनीस व परिचारिका ह्यांनी केले.या अर्थाने आशा स्वयंसेवीका,अंगणवाडी सेविका, मदतनीस व परिचारिका ह्या खऱ्या समाजसेविका आहेत.
त्यांचा सन्मान करण्यासाठी भांगडिया फाउंडेशन च्या वतीने सुरु केलेला स्नेहमिलन सोहळा मी आमदार असो वा नसो, यापुढेही नेहमीच चालत राहील. याचा राजकारणाशी संबंध नाही. तुमच्या कार्याच्या व त्यागाच्या सन्मानार्थ सुरु केलेला हा सोहळा निरंतर चालत राहील. मी तुम्हा सगळ्यांच्या कार्याला सलाम करतो, असे प्रतिपादन आमदार बंटी भांगडिया यांनी केले.