लाखनी ठाणेदाराचा अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध एल्गार. ★ पोलिस ठाण्याचे हद्दीतील ६१ पैकी ४५ गावात दारू विक्री बंद ; तंटामुक्त समिती आणि महिला मंडळाचे सहकार्य.


लाखनी ठाणेदाराचा अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध एल्गार.


★ पोलिस ठाण्याचे हद्दीतील ६१ पैकी ४५ गावात दारू विक्री बंद ; तंटामुक्त समिती आणि महिला मंडळाचे सहकार्य.


नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी,भंडारा


भंडारा : अवैध दारू विक्रीमुळे गावाची शांतता व सुव्यवस्था बिघडून अराजकता निर्माण होते. अवैध दारू विक्रीस आळा बसावा.याकरिता पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी अनेक गावात जाऊन अवैध दारू बाबद जनजागृती केल्यामुळे अवैध धंद्याचे दुष्परिणाम दिसू लागल्याने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती,महिला स्वयंसहाय्यता बचत गट तथा महिला मंडळाचे सहकार्याने पोलिस ठाण्याचे हद्दीतील ६१ गावापैकी ४५ गावात अवैध दारूविक्री बंद करण्यात यश आल्याने पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या जन जागृतीचे फलित असल्याच्या ग्रामीण परिसरात चर्चा होत आहेत. 


पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी एप्रिल २०२२ मध्ये लाखनी पोलिस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला. गावकऱ्यांकडून आलेल्या तक्रारींचा लवकरात लवकर निपटारा व्हावा.तथा पोलिस ठाण्याचे कामकाज सूचारू पद्धतीने चालावे. या करिता लाखनी शहर, गडेगाव, मुरमाडी, पोहरा, पिंपळगाव/सडक, सालेभाटा अशा ६ बिटांची निर्मिती करून जबाबदारी पोलिस हवालदार दर्जाच्या व्यक्तीकडे सोपविली. कार्यभार स्वीकारताच अवैध दारू विक्रीची अनेक प्रकरणे येऊ लागल्याने यावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी गाव कामगार पोलिस पाटलांची सभा घेऊन अवैध दारू विक्रेत्यांविषयी माहिती गोळा केली. 


जोपर्यंत गावातील महिला व पुरुषांचे सहकार्य मिळणार नाही तोपर्यंत अवैध दारू विक्रीवर आळा घालने अशक्यप्राय बाब असल्याचे निदर्शनास येताच पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी स्वतः केसलवाडा/वाघ, दिघोरी, कनेरी/दगडी, पिंपळगाव/सडक, सालेभाटा, मुरमाडी यासह अनेक गावात जाऊन गावकऱ्यांना अवैध धंद्याचे दुष्परिणाम समजावून सांगितल्याने गावातून अवैध धंदे बंद करण्यासाठी युवक वर्ग, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, गावातील महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या सहकार्याने पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ६१ गावांपैकी ४५ गावात अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यात यश आले असून उर्वरित गावात प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस हवालदार सुभाष राठोड यांनी सांगितले. 


ह्या गावात बंद आहे दारू विक्री : - 


लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेंढा, सेलोटी, गडपेंढरी, रेंगेपार/कोहळी, गराडा/टोला, नान्होरी, चिचटोला, कनेरी, पेंढरी, सावरी,सोमलवाडा, मेंढा/सोमलवाडा, रेंगेपार/कोठा, सोनेखारी, चिखलाबोडी, खुर्शीपार, गोंडसावरी, खेडेपार, सिंदीपार, किन्ही, गुंथारा, खुर्शीपार, मलकाझरी, सिपेवाडा, चान्ना, धानला, केसलवाडा/प. मोगरा,लाखोरी, बोरगाव,केसलवाडा/वाघ, पिंपळगाव/खुर्द, दिघोरी, सालेभाटा, मासलमेटा, नवेगाव, बरडकिन्ही, खैरी, चिचगाव,निलागोंदी, गुढरी, आलेसुर,बाम्हनी, सामेवाडा इत्यादी गावात अवैध दारू विक्री बंद आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !