मोखाळा ग्राम 85 टक्के मतदान करून नवउमेदवारांचे भवितव्य मशीन मध्ये बंद.

मोखाळा ग्राम  85 टक्के  मतदान करून नवउमेदवारांचे भवितव्य मशीन मध्ये बंद. 


विजय नरचुलवार - विशेष प्रतिनिधी


सावली : सावली तालुक्यातील मोखाळा ग्राम पंचायतचा कार्यकाळ डिसेंबर 2023 मध्ये संपत असल्याने येथील सार्वत्रिक ग्राम पंचायत निवडणूक आज दि. 05/11/2023 रोजी होत असून एकूण 2028 मतदार मतदानाचा हक्क बजावण्यात आले.  सदर ग्राम पंचायतसाठी थेट सरपंचाची निवड केली जाणार असून , तीन प्रभागमध्ये प्रत्येकी तिन तीन उमेदवार निवडले जाणार आहेत. त्या दृष्टीने सरपंच निवडीसाठी 2028 मतदार मतदानाचा हक्क बजावणार , तर प्रभाग क्रं. 01 मध्ये 718, प्रभाग 02 मध्ये 670 तर प्रभाग 03 मध्ये 640 मतदार असे एकूण 2028 मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते.


 त्यामुळे आज दि. 5/11/23 ला थेट सरपंच व ग्रा.प. सदस्य करीता सायं.5.30 वाजे पर्यंत  मतदान करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्र. 1 मध्ये 718 पैकी 588 मतदारांनी मतदान केले, तसेच प्रभाग क्र. 2 मध्ये 670 पैकी 570 मतदारांनी मतदान केले आणि प्रभाग क्र. 3 मध्ये 640 पैकी 565 मतदारांनी मतदान करून थेट सरपंच व नव ग्रा.प.सदस्यांचे भवितव्य मशीन बंद करण्यात आले आहे. या निवडणुकीत 2028 मतदारपैकी एकूण 1723 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यात आले. एकूणच 84 टक्के मतदान पार पडले. आणि या थेट सरपंच व नवग्रामपंचायत सदस्य यांचे भवी तव्य मशिन बंद उघडून मतमोजणी उद्या दिनांक 06/11/2023 ला होणार आहे.


सदर निवडणूक दरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या नियंत्रणात व पोलीस बंदोबस्तीत शांततेने मतदान पार पडले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !