पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित. ★ 8 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.

पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित.


★  8 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.


एस.के.24 तास


चंद्रपूर : दि.21/11/2023  पशुसंवर्धन विभागातंर्गत नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे,शेळी-मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे तसेच 100 कुक्कुट पिल्लांचे वाटप व तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. 


या योजनांसाठी ऑनलाईन पदधतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2023-24 या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी,पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे,त्याची निवड करण्याची सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


जिल्ह्यातील पशुपालक,शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवक - युवती व महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावे.ऑनलाईन अर्ज तसेच योजनेची संपुर्ण माहिती https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर तसेच गुगल प्ले-स्टोअरवरील अँड्रॉईड मोबाईल अॅप्लिकेशनचे AH-MAHABMS ॲपवर उपलब्ध आहे. 


अर्ज करण्याचा कालावधी 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2023 पर्यंत असणार आहे.योजने बाबत अधिक माहितीसाठी टोल - फ्री क्रमांक 1962 किंवा 1800-233-0418 यावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार),पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय,तालुका लघू पशुवैद्यकीय सर्व चिकीत्सालय अथवा नजीक च्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा,असे पशुसंवर्धन विभागामार्फत कळविण्यात आले आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !