धान खरेदीची अंतिम मुदत 31 जानेवारी 2024 पर्यंत ; मार्केटिंग फेडरेशनचे 42 तर आदिवासी विकास विभागाच्या 35 केंद्रावर खरेदी.


धान खरेदीची अंतिम मुदत 31 जानेवारी 2024 पर्यंत ; मार्केटिंग फेडरेशनचे 42 तर आदिवासी विकास विभागाच्या 35 केंद्रावर खरेदी.


एस.के.24 तास


चंद्रपूर : खरीप पणन हंगाम 2023-24 मधील किमान आधारभुत किंमत  खरेदी योजनेंतर्गत धान खरेदीला 9 नोव्हेंबर 2023 पासून सुरवात झाली आहे. मार्केटिंग फेडरेशनच्या 42 केंद्रावर व आदिवासी विकास विभागाच्या 35 खरेदी केंद्रामार्फत धान खरेदी करण्यात येत असून खरेदीची अंतिम मुदत 31 जानेवारी 2024 आहे. तसेच धान (साधारण एफ.ए.क्यू.) खरेदीचा आधारभूत दर प्रतिक्विंटल 2183 रुपये आहे.


शासनाने निर्धारीत केलेले दर व कालावधीस अनुसरून जिल्ह्यातील ऑनलाईन नोंदणीकृत शेतक-यांनी खरेदी केंद्रावर जावून आपल्या धानाची विक्री करावी. धान विक्रीकरीता आणतांना शेतक-यांनी आपले आधारकार्ड, मतदान कार्ड, शेतीचा सातबारा, बँक खाते पासबुक, संपूर्ण माहितीसह खरेदी केंद्रावर जावून नियोजित कालावधीत धानाची विक्री करावी.तसेच काही अडचण आल्यास चंद्रपूरचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी व आदिवासी विकास महामंडळ मर्या. चे प्रादेशिक व्यवस्थापक यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे यांनी केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !