अखेर नवजात अर्भकाच्या मृत्यू प्रकरणी एका युवकास अटक.
★ एस.के.24 तास ला बातमी प्रकाशित करण्यात आली होती.
एस.के.24 तास
चिमुर : गावातील नालीत फेकून दिल्यामुळे एका नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्या प्रकरणी एकास चिमूर पोलिसांना अटक केली आहे.1 नोव्हेंबर का चिमूर तालुक्यातील बोडदा येथे ही घटना घडली होती. घटनेच्या सहा दिवसांनी पोलीसांनी कारवाई केली आहे.
एस.के.24 तास ला प्रकाशित करण्यात आली होती बातमी. |
मृतावस्थेत असलेल्या एका नवजात अर्भकाला नालीत फेकून दिल्याची हृहद्रावक घटना आज बुधवारी (1 नोव्हेंबर 2023) ला सायंकाळी चारच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील बोडदा गावातील हनुमान मंदिरा समोरील नालीत उघडकीस आली आहे. आढळलेले नवजात अर्भक बालिका असून ती दोन ते तीन दिवसाचे असून गावातील नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील बोडधा गावात 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास गावातील काही लोकांना हनुमान मंदिरासमोरील सांडपाणी वाहत असलेल्या नालीत नवजात अर्भक मृत्तावस्थेत आढळून आला होता. काही लोकांना तो अर्भक दिसून आला होता.भिसी पोलिसांना घटनास्थळी येवून नवजात अर्भकाला ताब्यात घेतले असता तो मृत्तावस्थेत होता. मृतावस्थेत आढळून आलेले अर्भक हे बालिका होती.पोलिसांनी लगेच त्या निर्दयी मातेचा शोध घेणे केले होते.
अनैतिक संबंधातून झालेल्या नवजात बाळामुळे गावात व समाजात बदनामी होईल भितीपोटी निर्दयी मातेने नवजात अर्भकाला गावातीलच नालित फेकून दिल्याने मृत्यू झाला.
अनैतिक संबंधातून जन्मास आलेल्या बाळाच्या मृत्यू प्रकरणी मातेच्या माहितीवरून गावातीलच मोहीत मोहनलाल नागोसे वय,21 याला अटक करण्यात आली आहे. त्याला काल सोमवारी रात्री कलम 376 पास्को सह गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.